Press "Enter" to skip to content

कोरोना लसीकरणाची व्यवस्था नागावं उपकेंद्रात द्या : सरपंच निखिल मयेकर

सिटी बेल । रायगड । अमूलकुमार जैन ।

अलिबाग तालुक्यातील नागावं ग्रामपंचायत सरपंच निखिल मयेकर यांनी रेवदंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची व्यवस्था नागावं येथील उपकेंद्रात करून देण्याची सरपंच निखिल मयेकर यांची मागणी केली आहे.

सरपंच निखिल मयेकर यांनी रेवदंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांना निवेदनात नमूद केले आहे की, नागावं ग्रामपंचायत हद्दीत रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रानंतर्गत उपकेंद्र आहे.या उपकेंद्रामध्ये कोरोना लस देण्यासाठी आवश्यक असणारी जागा अथवा इतर काही सुविधा ह्या अपुऱ्या असतील तर नागावं ग्रामपंचायत मार्फत ग्रामपंचायत सभागृह उपलब्ध करून देण्याची तयारी दाखविण्यात आली आहे.

ग्रुप ग्रामपंचायत नागांव हद्दीतील नागरिकांना व जेष्ठ नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी रेवदंडा आरोग्य केंद्रामध्ये जावे लागत आहे. काही जेष्ठ नागरिकांची प्रकृती ठिक नसल्यामुळे त्यांना प्रवासाचा त्रास होतो.तसेच लॉकडाऊन असल्यामुळे खाजगी वाहने करून लसीकरणासाठी जाणे हे सर्वांना शक्य नसते. त्यामुळे लसीकरणाची सोय आपल्या नागांवच्या उपकेंद्रामध्ये उपलब्ध करून द्यावी जेणेकरून नागांव मधील सर्व जेष्ठ नागरिकांना लसीकरणाचा लाभ घेता येईल.

यासाठी नागांव आरोग्य उपकेंद्रामध्ये उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सरपंच निखिल मयेकर यांनी केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.