सिटी बेल । आवरे । करण ठाकूर ।
आवरे गावात गेली 7 वर्षे घेण्यात येणारी मॅरेथॉन स्पर्धा ही या वर्षी कोरोना महामारी व सरकारी आचार संहिता लक्षात घेता रद्द करण्याचा निर्णय निगा फाऊंडेशन चे अध्यक्ष श्री.निलेश गावंड सर व सभासदांनी जड अंतकरनाणे ने घेतला आहे.
सध्या कोरोना महामारीचे सावट हे भारतातच नाही तर संपूर्ण जगावर आहे.कोरोना ही महाभयंकर महामारी आहे स्पर्धा ठेवली तर अनेक स्पर्धक व प्रेक्षकांच्या आरोग्याला धोकादायक ठरू शकते तसेच सरकारी आचार संहितेचे उल्लंघन ही होऊ शकते म्हणून या वर्षी होणारी आवरे मॅरेथॉन 2021 सदर स्पर्धा रद्द करण्यात आली आहे.
निगा फाऊंडेशन आवरे ही उरण पूर्व विभागातील नामांकित संस्था आहे या अगोदर संस्थेच्या तर्फे आवरे गावातील तलावात नवरात्रीच्या उपलक्षाने जलतरण स्पर्धा,तसेच आवरे गाव ते सारडे मार्गे ब्राम्हण देव मंदिर अशी 10 की.मी. मॅरेथॉन स्पर्धा,निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा, दीपावली संगीत पहाट,होतकरू गरीब विद्यार्थ्यांना दत्तक योजना तसेच विद्यार्थ्यांचे सत्कार हे उपक्रम सुयश क्लासेस आवरे आणि निगा फाऊंडेशन आवरे राबवित आलेली आहे.जेथ पर्यंत ध्येय प्राप्ती नाही तेथ पर्यंत विश्राम नाही.








Be First to Comment