सिटी बेल । नागोठणे । महेश पवार ।
आजच्या परिस्थितीत परीक्षा घेणे ही केवळ शिक्षण विभागाची जबाबदारी नाही तर त्यासाठी इतर सर्व विभाग, विद्यार्थी, पालक आणि समाजातील सर्व घटकांना प्रयत्न करावे लागतील. ऑफलाईन परिक्षा म्हणजे घरी बसून नाही तर त्यासाठीही परीक्षा केंद्रावर जावं लागणार आहे. त्यामुळे जुनमध्ये का होईना ऑनलाइनऐवजी नेहमीप्रमाणे ऑफलाइन परिक्षा घेणंच योग्य होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबतही शंका उपस्थित केली जाणार नाही. भविष्यात त्यांना अडचणही येणार नाहीत, असे मत रोहा तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस अध्यक्ष अक्षय अनिल नागोठणेकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
कोरोनाचा उद्रेक झाला असताना एम.पी.एस.सी ची परीक्षा घेण धोक्याच ठरल असतं अशा स्थितीत परीक्षा पुढे ढकलण्याचा राज्य शासनाचा निर्णय हा योग्य असून इयत्ता १० वी १२ वी परीक्षा संदर्भात सुद्धा लवकरात लवकर निर्णय होणे गरजेचे असल्याची भावना व्यक्त करून नागोठणेकर पुढे म्हणाले की, मुलांची शाळा हेच त्यांचे परीक्षा केंद्र असणार असल्यामुळे त्यांना दुसऱ्या केंद्रावर जावे लागणार नाही. दरम्यान, परिक्षेपूर्वी या प्रक्रियेतील सर्वांचं लसीकरण करणे देखील महत्वाचे आहे.
विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबत राज्य शासनाने केंद्र शासना सोबत चर्चा केली पाहिजे . निकाल वेळेवर लावण्यासाठीही आतापासूनच नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत अनेक मुद्दे मांडत परीक्षा बाबत शिक्षणमंत्री योग्य निर्णय घेतील असा विश्वास अक्षय नागोठणेकर यांनी व्यक्त करून रोहा तालुक्यातील प्रत्येक परिक्ष केंद्रावर रायगड जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे तसेच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. आदितीताई तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या मार्फ़त परीक्षा कालावधी मध्ये कोरोना प्रतिबंधक मास्क आणि जागोजागी शालेय परिसरात सँनिटायझर हँड वाॅशचे स्टँडपोस्ट सुद्धा बनवविण्यात येणारे असल्याचे अक्षय नागोठणेकर यांनी सांगितले.








Be First to Comment