सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :
नागोठणे एज्युकेशन सोसायटीच्या उर्दू हायस्कूल व ज्युनिअर काॅलेजचा बारावीच्या परिक्षेतीचा वाणिज्य व कला शाखेचा एकूण निकाल ७८.३७ टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेत कुमारी सिमरा कासिम दफेदार ही विद्यार्थिनी ८७.५३ टक्के गुण मिळवून ज्युनिअर काॅलेज मध्ये पहिली आली. कुमारी उरुसा इनायतुल्ला अधिकारी (८५.३८ टक्के) व कुमारी सायमा कमीस (८५.०७ टक्के) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. तर कला शाखेत कुमारी सिम्मी इरफान किरकिरे (६७.६९ टक्के), कुमारी महेक जाविद दापोलकर (६० टक्के) व कु. मुस्तफा इल्यास (५७.०७ टक्के) हे अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकाने उत्तीर्ण झाले. उर्दू हायस्कूल व ज्युनिअर काॅलेज बारावीच्या परिक्षेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे नागोठणे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष समदशेठ अधिकारी, सचिव लियाकतशेठ कडवेकर, मुख्याध्यापक ईर्शाद कुणके आदींसह अनेकांनी अभिनंदन केले.






Be First to Comment