Press "Enter" to skip to content

अरेरे… अज्ञात वाहनाच्या धडकेने बैलाच्या पायाला गंभीर जखमा

सिटी बेल । नागोठणे । महेश पवार ।

मुंबई – गोवा महामार्गावर गोडसई गावाच्या हद्दीमध्ये एका बैलाला अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसल्यामुळे यामध्ये बैलाच्या पायाला गंभीर जखमा होऊन यामध्ये बैलाचा पाय पुर्णत: मोडला गेला आहे.

मुंबई – गोवा महामार्गावर सद्यपरिस्थितीत मोकाट गुरे मोठ्या प्रमाणात फिरतांना दिसत आहेत. गुरे मालकांचा गुरांवरती थोडाही वचक राहीलेला दिसत नाही. यातच महामार्गावर गुरांना अपघात झाला की, यामध्ये वाहनचालकांनाच दोष देण्यात येतो. महामार्गावर गोडसई गावाच्या हद्दीमध्ये एटीव्ही कंपनीच्या समोरच एका अज्ञात वाहनाची एका बैलाला जोरदार धडक बसली. यामध्ये बैलाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असुन त्याचा एक पाय पुर्णपणे मोडला गेला आहे. त्यामुळे बैल मालक असलेल्या गोडसई गावातील संतोष कदम यांना काही वेळाने समजल्यानंतर त्यांनी त्या बैलाला घरी नेले. पंरतु यात बैलाचा पाय मोडल्याने मालकाचे मोठे नुकसान झाले आहे.

त्यामुळे महामार्गावर फिरणा-या मोकाट गुरांचे जे कोणी मालक असतील त्यांनी आपल्या गुरांना उनाड न सोडता त्यांच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.