Press "Enter" to skip to content

ऐनघर ग्रामपंचायत हद्दीत दोन दिवसात आढळले चार कोरोना रुग्ण

दोन महिन्याच्या बालकाचाही समावेश

सिटी बेल । नागोठणे । महेश पवार ।

संपुर्ण राज्यासह रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या दुस-या लाटेने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात भर पडतानाचे चित्र पहावयास मिळत आहे. रोहा तालुक्यात नागोठणे शहर व परिसरामध्येही कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली असुन ऐनघर ग्रामपंचायत हद्दीमध्ये दोन दिवसात चार कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये एक दोन महिन्याच्या बालकाचाही समावेश असल्याने नागरिकांच्या मनामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ऐनघर ग्रामपंचायत हद्दीमध्ये मागील दोन दिवसात बाळसई येथे एक रुग्ण तर कानसई एम. एस. ई. बी काॅलनी मधिल तिघांचा समावेश आहे. यामध्ये आई – वडिलांसह एका दोन महिन्याच्या मुलीला देखील कोरोना झाला आहे. त्यामुळे कोरोनाची दूसरी लाट ही भयानक असुन यामध्ये लहान मुलांना जास्तीत जास्त कोरोना होण्याची भिती वर्तविण्यात आली आहे.

ढगाळ वातावरणामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता

सद्यस्थितीत वातावरणात होणा-या वारंवारच्या बदळामुळे कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आज सकाळपासुनच नागोठणे विभागासह आजुबाजुच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण व पडलेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाल्यामुळे वेगवेगळया आजारपणात वाढ झालेली दिसून येत आहे.

त्यामुळे विभागातील नागरिकांनी योग्य ती काळजी घ्या. यामध्ये बाहेर पडतांना मास्क वापरणे, गर्दीची ठिकाणे टाळणे, सेनिटायझरचा वापर करणे, लहान मुलांना गर्दीच्या ठिकाणी न नेणे, पाणी गरम करुन पिणे, ताप, सर्दी, खोकळा अशी लक्षणे दिसुन आल्यास जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करुन घेणे अशा सुचनांचे पालन करण्याचे आवाहन नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डाँ. चेतन म्हात्रे यांनी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.