
सुधागड तालुक्यात स्वस्त आणि चांगल्या आरोग्य सेवा मिळण्यासाठी जनतेने एका मोठ्या लढ्यास सज्य रहावे – महेश पोंगडे महाराज
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)
सुधागड तालुका जणू समस्यांचे माहेरघर बनू लागले आहे. सुधागड तालुक्यात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. त्यातच पालीत तब्बल 22 कोटी अपेक्षित खर्च असलेले 25 खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर आहे. मात्र तेथे आजतागायत एकही वीट रचली गेलेली नाही. म्हणून तालुक्यातील जनतेला स्वस्त आणि चांगल्या आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी ग्रामीण रुग्णालय होणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी संघर्ष करायला तयार व्हा! असे आवाहन सत्यशोधक वारकरी सांप्रदायाचे रायगड जिल्हाध्यक्ष ह.भ.प महेश पोंगडे महाराज यांनी केले आहे.
सरकारे बदलली आणि मंत्री, खासदार व आमदार यांच्या उपस्थिती दोन वेळा ग्रामीण रुग्णालयाच्या पायभरणीचा नारळ फोडला गेला, मात्र पुढे काहीच झाले नाही. नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा मिळण्यासाठी तालुक्याबाहेर जाऊन पदरमोड करावी लागत आहे. तसेच गरीब व आदिवासी बांधवांचे तर खूप हाल होतात. सुधागडच्या गोरगरीब व आदिवासी जनतेला स्वतःच्या तालुक्यात स्वस्त आणि चांगले उपचार मिळून देणे हे आपले काम असून आपण सर्वांनी मला सहकार्य करणे अपेक्षित आहे. महाराष्ट्रमधे झाले नसेल असे आंदोलन आपण करूया “ग्रामीण रुग्णालयासाठी. कोरोना संपल्यावर हे जनआंदोलन करूया..! या लढ्यात आपण तण ,मन ,धन देऊन सहकार्य कारा! असे आवाहन महेश पोंगडे महाराज यांनी केले आहे.






Be First to Comment