Press "Enter" to skip to content

नागोठण्यात गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सिटी बेल । नागोठणे । महेश पवार ।

नागोठण्याजवळील वरवठणे गावाच्या हद्दितील अंबा नदी किनारी असलेल्या झाडाला एका ३५ वर्षीय आदिवासी तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार दि. ७ एप्रिल रोजी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

आदिवासी असलेल्या तरुणाची अद्याप ओळख पटली नसून या घटनेची नागोठणे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी नागोठणे पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे.काॅ. जितेंद्र चव्हाण हे पुढील तपास करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.