शॉट सर्कीट लागल्यामुळे कार जळून खाक
सिटी बेल । काशिनाथ जाधव ।
पाताळगंगा ।
मुंबई – पुणे एक्सप्रेस हा प्रवासी वर्गांसाठीआत्यंत जवळीक मार्ग असल्यामुळे या मार्गावरील बहुतेक वहाने या मार्गावरून प्रवास करीत असतांना. शिवाय हा रस्ता उत्तम दर्जाचा असल्यामुळे वहानांचा वेग ही मोठ्याप्रमाणावर असतो.मात्र काही वेळा वहानावरील नियंत्रण सुटल्यांने मार्गावर आपघात होत असल्याचे निदर्शनास येत आहे.तर काही वेळा वहान अचानक पेट घेण्याचे प्रकार वाढत आहे.असाच प्रकार आज मुंबई – पुणे एक्सप्रेस पुणे लेनवरून पुण्याकडे दुपारी 1 वाजून 20 वाजण्याच्या सुमारास जाताना कारमध्ये लागलेल्या शॉट सर्कीट मुळे कारमध्ये आग लागल्याने या आगीत कार पुर्णपणे जळून खाक झाली असून सुदैवाने जीवित हानी झाली नाही.
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर Km 5/900 पुणे लेंनवर सदर गाडी पुणे बाजूने जाताना शॉर्ट सर्किट मुळे गाडीला आग पकडली. तर सुदैवाने गाडीतील प्रवासी सुखरूप पणे बाहेर निघाले असून देवदूत यंत्रणेने आग वीजवण्याचा प्रयत्न केला, परंतु आग एवढी मोठी होती कि गाडी जाळून खाक झाली.
तर आगीने भयंकर रुप धारण केल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळात रोखण्यात आली. वाहनांने अचानक पेट घेतल्यामुळे वहानातील प्रवासी हे तातडीने गडीबाहेर आले.तो पर्यंत त्या आगीने उग्र रुप धारण केले.वहान त्या मध्ये जळून खाक झाली.शिवाय या अपघातामुळे वाहतुकीची कोंडी झाल्यामुळे प्रवासी वर्गांना काही वेळ आपली वहान बाजुला लावून उभे राहण्याखेरीज पर्याय नसल्यामुळे काही वेळ वाहतुक खोळंबळी होती.








Be First to Comment