सिटी बेल । उरण । सुनिल ठाकुर ।
महाराष्ट्र राज्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच अनेक गरजू गोरगरीब रुग्णांना रक्ताची तातडीने खूप मोठी गरज निर्माण झाली आहे. वाढत्या कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे त्यामुळे आणीबाणीची परिस्थिती लक्षात घेता गोरगरिबांना त्वरित रक्ताचा पुरवठा व्हावा या दृष्टीकोणातून आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्था चाणजे विभाग तर्फे गुडीपाडवाचे औचित्य साधून मंगळवार दि 13/4/2021 रोजी सकाळी 10 ते 3 या वेळेत जेष्ठ नागरिक उद्यान, मुळेखंड फाटा, उरण येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यात उदभवलेल्या परिस्थितीला धैर्याने सामोरे जाण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने जास्तीत जास्त इच्छुक रक्तदात्यांनी या रक्तदानाच्या पवित्र कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थे तर्फे करण्यात आले आहे. ज्यांना रक्तदान करायचे आहे त्यांनी सुमित थळे चाणजे विभाग अध्यक्ष -9870660369,
चेतन गावंड -9819759105,
सागर म्हात्रे – 9930307920,
रवींद्र भोईर -9969314311
यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Be First to Comment