सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे,(नंदकुमार मरवडे)
सामाजिक बांधिलकी व एक वेगळ्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानचे वतीने कोलाड विभागातील विविध शाळांना फवारणी पंप वाटपाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
रायगडचे खा.सुनील तटकरे, पालकमंत्री ना.आदिती तटकरे व विधान परिषद आ.अनिकेत तटकरे यांच्या सहकार्याने आतापर्यंत प्रतिष्ठानचे माध्यमातून विविध शैक्षणिक, सामाजिक, कला,क्रीडा क्षेत्रासाठी विविधांगी उपक्रम राबविले जात आहेत.त्याचाच एक भाग म्हणून कोलाड विभागातील कोलाड हायस्कूल, तिसे हायस्कूल, सुतारवाडी हायस्कूल आदी विद्यालयात
फवारणी पंपाचे वाटप करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.यावेळी युवा कार्यकर्ते राकेश शिंदे,श्रीकांत चव्हाण तसेच हायस्कूलच्या वतीने काळे सर, येरुणकर सर, महाडिक सर, तिरमले सर, खराडे सर, सय्यद सर आणि कोलाड विभागातील सर्व युवा कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाच्या वेळी जेष्ठ शिक्षक शिरीष येरुणकर सर यांचा युवा प्रतिष्ठानच्या वतीने वाढदिवसही साजरा करण्यात आला.सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानचे वतीने विविध शाळांना फवारणी पंपाचे वाटप करण्यात आल्याने वाटप करण्यात आलेल्या शाळा प्रशासनाचे वतीने प्रतिष्ठानचे जाहीर आभार व्यक्त करण्यात आले आहेत.






Be First to Comment