सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दलित आदिवासींना सामाजिक ; शैक्षणिक आरक्षणासोबत राजकीय आरक्षण ही संविधानात अंतर्भूत केले. त्यामुळे राजकीय आरक्षण हा दलितांचा घटनात्मक अधिकार आहे.तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. दलितांचे राजकीय आरक्षण हिरावून घेण्याचा कोणी प्रयत्न केल्यास रिपब्लिकन पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल असा ईशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिला आहे. राजकीय आरक्षण दुबळ्या ,मागास घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यास व सर्वांगीण प्रगती साधण्यास उपयुक्त ठरणारे आहे.
दलित आदिवासींसाठी असणारे राजकीय आरक्षण कुणाला नको हवे असेल तर त्याने त्याच्या पुरते ते नाकरावे; ज्याला नको असेल त्याने राजकीय आरक्षण घेऊ नये मात्र दलित आदिवासींसाठी चे राजकीय आरक्षण बंद करण्याची चुकीची मागणी कोणी करू नये असे ना.रामदास आठवले म्हणाले.
राजकीय आरक्षण ह दलितांचा घटनात्मक अधिकार आहे.तो अधिकार कोणी हिरावून घेऊ शकत नसल्याचे ना रामदास आठवले म्हणाले.






Be First to Comment