धाटाव पोलीस ठाण्यासमोरील बंद अवस्थेत धूळ खात उभ्या वाहनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
सिटी बेल । धाटाव । शशिकांत मोरे ।
रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहितिमधे अंतर्गत रस्त्यावर गेली कित्येक महिन्यांपासुन धाटाव पोलीस ठाण्यासमोरच बेवारस अवस्थेत धूळ खात बंद अवस्थेत उभ्या असलेल्या मारुती कंपनीच्या ओम्नी कारकडे संबंधित प्रशासनासह पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.दरम्यान ही ओम्नी कार गेली कित्येक महिने अद्याप तरी बेवारस अवस्थेतच असल्यामुळे याठिकाणी दिवसा ढवल्या चोऱ्या करणाऱ्या चोरटयांचा डोळा या उभ्या वाहनाकडे असल्याचे समजते.मात्र ही कार कोणाची? असा प्रश्नहीँ अनेकांना पडला आहे.
औद्योगिक वसाहतीत अंतर्गत रस्त्यावर धाटाव पोलीस ठाण्यासमोरच डाव्या बाजूला उभ्या असलेल्या पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी कंपनीची एम एच ०६ जे.६९१ क्रमांकाच्या ओम्नी कार वर अक्षरशः धुळीचा थर साचला आहे.गेली कित्येक महिन्यांपासुन उभी असलेली ही ओम्नी कार जणू अक्षरश: बेवारस अवस्थेतच आहे.याठिकाणी ट्रक टर्मिनलचा प्रश्न अद्याप तरी अधान्तरिच असून वाहने रस्त्यात अभी असल्यामुळे रहदारीला अडचण निर्माण होत आहे.तर यामुळे कित्येक अपघात घडत आहेत.अनधिकृत बांधकाम,बंद पथदिवे,अवैध्य पार्किंग यांसह इतर समस्यांकडे औद्योगिक विकास महामंडळाचे याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा नागरिक वर्गातून आरोप होताना दिसतो.
याठिकाणी उभ्या वाहनातून अनेकदा चोरीचे प्रकार झाले असल्याने अशा भंगार व बंद अवस्थेत असलेल्या वाहनाची चोरी होण्याची दाट शक्यता आहे.तर ही कार चोरीसाठी वापरली जात आहे की चोरीचीच आहे अशा अनेक शंका कुशंका समोर येत आहेत.दरम्यान धाटाव पोलिस ठाण्यात संबंधीत वाहनाबाबत चालक अथवा मालकाची कोणत्याही प्रकारची तक्रार नसल्याचे पोलिसांकडून सांगितले.








Be First to Comment