Press "Enter" to skip to content

आ.अनिकेत तटकरे यांच्या प्रयत्नाने नागोठणे विभागातील व्यायामशाळांना निधी

पाटणसई, पळस व कडसुरे ग्रामपंचायतींचा समावेश

सिटी बेल । नागोठणे । महेश पवार ।

रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांंच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्ह्याच्या पालकमंत्री अदितीताई तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रयत्नाने रायगड जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या व्यायाम शाळांच्या इमारतींसाठी व साहित्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहेे. नागोठणे विभागातील पाटणसई, पळस व कडसुरे ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश असल्याने व्यायामप्रेमी तरुण वर्गांतून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

नागोठणे विभागातील कडसुरे ग्रामपंचायती अंतर्गत कडसुरे येथे नवीन व्यायामशाळा इमारत बांधणे ( रु. ६ लाख) व पळस ग्रामपंचायती अंतर्गत बाहेरशीव येथे व्यायाम शाळेसाठी नवीन इमारत बांधणे (रु. ७ लाख) तसेच पाटणसई ग्रामपंचायती अंतर्गत चिकणी गावातील व्यायाम शाळेसाठी साहित्य पुरवठा करणे (रु. ७ लाख) यासाठी शासन निर्णयानुसार व्यायामशाळा विकास अनुदान योजने अंतर्गत प्रस्तावांना रायगडच्या जिल्हा क्रीडा अधिका-यांकडून मान्यता देण्यात आली आहे. याच मंजुरीचे पत्र आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या हस्ते आणि राष्ट्वादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय नेते भाई टके, शिवरामभाऊ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कडसुरे ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र शिंदे, पाटणसई ग्रामपंचायतीचे सदस्य सचिन कळसकर यांना देण्यात आले. यावेळी विक्रांत घासे, अशोक देवरे, बाळकृष्ण देवरे आदींसह चिकणी, पळस व कडसुरेतील राष्ट्वादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.