न्यु व्हिजन महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यी उंच भरारी घेणार — राजु पिचीका
सिटी बेल । पेण । वार्ताहर ।
सामाजिकदृष्ट्या आपल्या मनात असणा-या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकरीता पेण मध्ये अधिक सोईस्कर शिक्षण मिळविण्यासाठी न्युज व्हिजन महाविद्यालयाच्या स्थापना करण्यात येत असून याच माध्यमातून विद्यार्थी उंच भरारी घेणार असल्याचे प्रतिपादन व्हिजन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजु पिचीका यांनी केले.
पेण येथील कारमेल स्कुल जवळील देवनगरी येथे आज व्हिजन एज्युकेशन सोसायटी अंतर्गत न्यु व्हिजन महाविद्यालयाच्या बांधकामांचे भुमिपूजन अध्यक्ष राजु पिचीका, प्रसिद्ध उद्योजक तथा संचालक रशाद मुजावर, सुजित काठे, मिलिंद कांबळे, संचालिका प्रतिक्षा कदम, निता रामधरणे, गौरव रामधरणे प्रणाली कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलतांना रशाद मुजावर म्हणाले की आपल्याकडे अनेक मुले ही शैक्षणिकदृष्ट्या सक्षम आहेत मात्र त्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक अडचण येत असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहिलेले आहे त्यामुळे आपल्याकडे अशा विद्यार्थ्यांसाठी संस्थेच्या माध्यमातून पाच टक्के निधी त्यांच्यासाठी वापरता येईल अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.तर इंग्लिश मिडीयम मध्ये शिक्षण घेणारी मुले पुढे जाऊन मराठी माध्यमाचा साहारा घेतात मात्र यापुढे येथे इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना शेवट पर्यंत इंग्रजीचे शिक्षण घेता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तर या महाविद्यालयात उच्च शिक्षित शिक्षक असणार आहेत तसेच शिक्षणाबरोबरच स्पर्धा परीक्षा, निट, तसेच क्रिडा विषयीक मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती निता रामधरणे यांनी दिली.








Be First to Comment