Press "Enter" to skip to content

रसायनी रेल्वे स्थानकावर तुराडे येथील तरुणाचा रेल्वेखाली सापडून जागीच मृत्यू

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।

तुराडे येथील मयुर मोरेश्वर महाडिक (वय २४ ) या तरुणाचा मंगलवार दि.६ रोजी दुपारच्या सुमारास रेल्वे पकडताना पाय घसरून रेल्वेखाली सापडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.याबाबत माहिती अशी की रसायनी रेल्वे स्टेशन अप लाईंनवर स्टोन क्रमांक ७९/२१/२३ च्याजवल रोहा-पनवेल वर्कं मॅन स्पेशल ही चालू ट्रेन पकडताना मयुरचा पाय घसरून रेल्वेखाली गेला.यात रेल्वे अंगावरुन गेल्याने त्यामध्ये गंभीर दूखापत होवून शरीराचे कमरेतून दोन तुकडे होवून जागीच मयत झाला.

याबाबत रसायनी पोलिस ठाण्यात नरेश सत्यवान दुलन यांनी फिर्याद दाखल केली असून घटनास्थळी रसायनी पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक सुजाता तानवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुल्ला सर यांनी भेट दिली.याबाबत रसायनी पोलिस ठाण्यात सिआरपीडी १७४ प्रमाणे नोंद झाली असून पोलिस म्हात्रे तपास करीत आहेत.मयुरच्या मृत्यूमुळे तुराडे गावावर शोककळा पसरली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.