Press "Enter" to skip to content

रोह्यात मास्क न घालणा-यांवर कारवाई

सिटी बेल । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।

रोहे नगर पालिकेच्या वतीने विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईस प्रारंभ केला असून सुरूवातीला समज देऊन सोडण्यात आले आहे.

संपूर्ण शहरात मास्क वापरण्यास सक्ती करण्यात आली आहे. मात्र तरीही मास्क न लावणा-या नागरिकांवर नगर पालिका प्रशासनाचे वतीने दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव हळूहळू वाढू लागल्याने या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात मास्क वापरणे अनिवार्य करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. त्या अनुषंगाने रोहे नगर पालिकेच्या वतीने सदरची कारवाई करण्यात आली आहे.

रोहे शहरात अनेक नागरिक जिल्हा प्रशासनाचे निर्देशांचे पालन न करता विनामास्क फिरताना दिसत आहेत. याचे गांभिर्य ओळखून व आपला विभाग व शहरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी यासाठी नगर पालिका प्रशासन यंत्रणा व पोलिस यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वतः नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, उपनगराध्यक्ष महेश कोलाटकर व नगर पालिका यंत्रणा तसेच पोलिस यंत्रणा आदींच्या वतीने सदर. कारवाईस प्रारंभ करण्यात आला आहे.

विनामास्क बाजारात फिरणाऱ्या व नियमांचे पालन करणारे दुचाकीस्वार, चारचाकी वाहनचालक, व्यापारी व नागरिकांवर सदरचे कारवाईला सुरुवात केली आहे.या कारवाई अंतर्गत नागरिकांनी सुरक्षितता व स्वच्छता यांचे नियमांचे पालन करावे,गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा, स्वतः सुरक्षित राहून आपले परिवार सुरक्षित ठेवा, प्रशासनाचे नियमांचे पालन करून आपला विभाग कोरोना संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी यावेळी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.