सिटी बेल । माथेरान । मुकुंद रांजाणे ।
मागील दोन वर्षांपासून येथील घोड्यांची पासिंग घेतली गेली नव्हती त्यासाठी संबंधीत अधिकारी वर्गाकडे धनगर समाजाचे अध्यक्ष तथा अश्वपाल राकेश कोकळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळेच येथील एकूण अधिकृत ४६० घोड्यांची पासिंग प्रक्रिया दि.३१ मार्च पासुन माथेरान पोलीस ठाण्याच्या आवारात सुरू करण्यात आली आहे.

सदर पासिंग करण्यात आलेल्या घोड्यांना अधिकृत क्रमांक दिले जात असून आपला घोड्यांचा व्यवसाय हा अधिकृत परवानाधारक असल्याबाबत ठोस पुरावा असतो यासाठी अश्वपाल सुद्धा घोड्यांची पासिंग घेण्यासाठी आग्रही असतात. मागील दोन वर्षे ही पासिंग काही कारणास्तव होऊ शकली नव्हती याकामी धनगर समाजाचे अध्यक्ष स्थानिक अश्वपालक राकेश कोकळे यांनी जिल्हाधिकारी रायगड, डीवायएसपी कर्जत त्याचप्रमाणे रायगड जिल्हा अधीक्षक यांना लेखी निवेदन तसेच प्रत्यक्ष भेट घेऊन पासिंग बाबतीत मागणी केली होती. त्यानुसार दोन वर्षानंतर ही पासिंग घेण्यात येत आहे त्यास अश्वपाल सुध्दा चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहेत.
माथेरान सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत काळे, पशु वैद्यकीय अधिकारी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही पासिंग घेण्यात येत आहे.








Be First to Comment