Press "Enter" to skip to content

माथेरानमध्ये लसीकरणास जेष्ठांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद

सिटी बेल । माथेरान । मुकुंद रांजाणे ।

माथेरानमधील शासकीय रुग्णालयात जेष्ठांसाठी लसीकरणास जेष्ठ नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत असून कोणतीही भीती न बाळगता नागरिक मोठ्याप्रमाणात लसीकरनात सहभाग नोंदवताना दिसून येत आहेत.

माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी माथेरानमध्येच लसी करण केंद्र असावे ह्यासाठी जिल्हाधिकारी मॅडम बरोबर पाठपुरावा केल्यामुळेच हे केंद्र सुरू झाले आहे माथेरानमधील जेष्ठ नागरिकांसाठी लसीकरणाची सुरवात केव्हा होणार ह्याची सर्वच जण वाट पाहत होते माथेरान हे पर्यटनस्थळ असल्याने येथे देशातील विविध ठिकाणाहून पर्यटक येत असतात त्यांचा थेट संबंध येथील नागरिकांबरोबर येत असतो त्यामुळे येथील नागरिक माथेरानमध्ये लसीकरण सुरू व्हावे अशी मागणी करीत होते ह्यापूर्वी लसीकरणास सुरवात होताच पहिल्या टप्प्यात येथील पालिका कर्मचाऱ्यांना कर्जत येथील शासकीय रुग्णालयात जाऊन लस घ्यावी लागत होती त्यानुसार पहिली लस घेण्याचा मान वरिष्ठ लिपिक श्री नरेंद्र धनावडे याना मिळाला होता पण वरिष्ठ नागरिकांना कर्जत येथे जाऊन लस घेणे शक्य नसल्याने माथेरान मधेच लसीकरण सुरू व्हावे अशी मागणी माथेरानमधून होत होती माथेरानच्या नगराध्यक्षा सौ प्रेरणा सावंत यांनी माथेरान शासकीय रुग्णालयास लस प्राप्त व्हावी ह्यासाठी प्रयत्न केले.

लसीकरणास शासनाने अनुकूलता दाखवताच येथील रुग्णालयातील वैदकीय अधिकाऱ्यांना लसीकरणाचे प्रशिक्षण देऊन आज प्रत्यक्ष लसीकरणास येथील पालिका रुग्णालयात आजपासून सुरवात करण्यात आली रोज टप्प्याटप्प्याने जेष्ठ नागरिकांना लस देण्यात येणार आहे आजपर्यंत माथेरान मधील सत्तर जेष्ठ नागरिकांनी ही लस घेतली असून लसीकरणाची कोणालाही त्रास झालेला नाही माथेरानमध्ये लसीकरणास सुरवात व्हावी अशी मागणी माथेरान मनसे शाखेनेही केली होती तर लसीकरणास जाणाऱ्या जेष्ठ नागरिकांना पालिका प्रशासनानें रुग्णवाहिकेची सोय केल्याने जेष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला होता.

नगराध्यक्षा सौ प्रेरणा सावंत ह्यांनीही ह्यावेळी लसीकरण केंद्रास भेट देऊन जेष्ठ नागरिकांची विचारपूस केली ह्यावेळी माथेरान शासकीय रुग्णालयातील वैदकीय अधिकारी डॉ उदय तांबे व डॉ प्रशांत यादव यांच्यासह श्री सदाशिव इंगळे व नर्स गोळे मॅडम आपुलकीने आलेल्या जेष्ठ नागरिकांची काळजी घेताना दिसून येत होते तर जेष्ठ नागरिक संघटनेचे श्री हरिभाई मेहता अनंता शेलार व नगरसेवक चंद्रकांत जाधव आलेल्या जेष्ठ नागरिकांची काहीही गैरसोय होणार नाही ह्याची काळजी घेताना दिसत होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.