Press "Enter" to skip to content

खालापूरात दोन महामार्गावर वाहने उलटली,वाहतूकीचा खोळंबा

सिटी बेल । काशिनाथ जाधव ।
पाताळगंगा ।

खालापूर तालुक्यात अपघाताची मालिका थांबता थांबेना झाली असून दररोज असंख्य अपघात होताना दिसत असल्याने चित्र सध्या पहावयास मिळत आहे. खालापूरातील महामार्गावर दोन वहान उलटल्याची घटना घडली असून या अपघातांमध्ये जीवीतहानी झाली नसली तरी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे.

खालापूर तालुक्यातील मुंबई - पुणे जुन्या महामार्गावर सकाळी साडेसहाच्या सुमारास हॉटेल बागेश्री जवळ खोपोलीकडून पनवेलच्या दिशेने जाणारा MH.46.AF.2500 क्रमांकाचा ट्रक उलटला तर खोपोली - पेण मार्गावर खोपोलीकडून - पेणच्या दिशेने जाणारी MH.12.KY.756 क्रमांकाची कार सकाळी दहाच्या सुमारास उलटल्याने या अपघात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुर्देवाने कोणतीही जीवितहानी झाली आहे. तर या दोन महामार्गावर उलटलेल्या वाहनांनमुळे वाहतूकीचा खोळंबा झाल्याने अनेक वाहन चालकांना व प्रवासी वर्गाचा वाहतूक कोंडीचा फटका बसला असून अपघातग्रस्त वाहन चालकांना परिसरातील नागरिकांनी मदत करून त्यांना अपघातग्रस्त वाहनांनमधून सुखरूप बाहेर काढले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.