Press "Enter" to skip to content

अपघाताच्या दरम्यान जखमी व्यक्तींना कशी मदत करायची याचे धडे

महामार्ग पोलिस केंद्र वाकण येथे ” मृत्युंजय दुत” यांना डाॅ. चेतन म्हात्रे यांचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन

सिटी बेल । नागोठणे । महेश पवार ।

महामार्ग पोलिस केंद्र वाकण येथे हायवे ” “मृत्युंजय दुत ” योजनेअंतर्गत विविंध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मृत्युंजय दुत यांना स्ट्रेचर व प्रथमोपचार किटचे वाटप तसेच नागोठणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डाॅ. चेतन म्हात्रे यांनी अपघाताच्या दरम्यान जखमी व्यक्तींना कशी मदत करायची याचे विविध प्रात्यक्षिके दाखवुन मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रोहा पंचायत समिती सदस्य संजयजी भोसले, नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डाॅ. चेतन म्हात्रे, रायगड जिल्हा मनसे अध्यक्ष तसेच रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष देवेंद्र गायकवाड, महाराष्ट्र राज्य वाहतुक संघटना उपाध्यक्ष सुबोध जाधव, नागोठणे लायन्स क्लब अध्यक्ष संदिप नायर, उपाध्यक्ष विवेक सुभेकर, महामार्ग पोलिस निरिक्षक गौरी मोरे, वाकण चौकीचे पोलिस उपनिरीक्षक परशुराम भोईर, त्यांचे सर्व कर्मचारी, नागोठणे विभागातील सर्व आशा सेविका, हायवे मृत्युंजय दुतचे सदस्य व विभागातील नागरिक उपस्थित होते.

यावेळी महामार्ग पोलिस निरिक्षक गौरी मोरे, रायगड जिल्हा मनसे अध्यक्ष देवेंद्रजी गायकवाड, नागोठणे लायन्स क्लबचे उपाध्यक्ष विवेक सुभेकर यांनी उपस्थित असलेल्या मृत्युंजय दुतांना अनमोल असे मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे डाॅ. चेतन म्हात्रे यांनी महामार्गावर अपघात झाल्यानंतर जखमींना नेमकी कोणत्या पद्धतीने व कशी मदत करायची याची वेगवेगळया प्रकारची प्रात्यक्षिके स्वत: व त्यांचे कर्मचारी तसेच आशा सेविका यांनी उपस्थित असलेल्या मृत्युंजय दुतांना तसेच नागरिकांना दाखवुन त्यांच्याकडुन ही पात्यक्षिके प्रत्यक्षात करुन घेतली. त्याचप्रमाणे नागोठणे लायन्स क्लबचे उपाध्यक्ष विवेक सुभेकर यांच्या दिवंगत वडिलांच्या स्मरणार्थ , रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष देवेंद्रजी गायकवाड व जिंदाल कंपनी यांच्याकडुन देण्यात आलेल्या स्ट्रेचर व प्रथमोपचार किटचे वाटप या मृत्युंजय दुतांना करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन वाकण चौकीचे पोलिस उपनिरीक्षक परशुराम भोईर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सर्व सहका-यांनी मेहनत घेतली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.