सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।
मुंबई-गोवा महामार्ग १७ वरील कोलाड पुई गावा नजिक एक वर्षा पासुन खोदून ठेवलेली मोरीच्या खड्ड्यात भरगच्च कोळश्याने भरलेला ट्रक पलटी झाल्याने एकच खळबळ उडाली असुन सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झाली नाही.
सविस्तर वृत्त असे की, वडखळ कडून महाड कडे जाणारा कोळश्याने भरलेला ट्रक क्रमांक एम. एच.०६ बी. डी.१०५९ हा ट्रक मुंबई -गोवा महामार्गाच्या पुई गावानजिक महामार्गाच्या कामात एका वर्षापासून खोदून ठेवलेल्या मोरीच्या कामाकरता खोदलेल्या खड्ड्यात ट्रकचा टायर स्लिप होऊन पलटी झाल्याची घटना घडली परंतु चालकाच्या सावधानी मुळे सुदैवाने कोणतेही जिवीत हानी झाली नसल्याचे समजले.
मुंबई-गोवा महामामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली दहा वर्षा पासुन सुरु असून सर्व कामे अर्धवट स्थितीत आहेत.कोठे ब्रिजचे काम,कोठे खिंडीतील खोदकाम, कोठे मोऱ्यांचे काम,कोठे उड्डाण पुलाचे काम,कोठे गटाराचे काम,तर कोठे रस्त्याचे कामे सुरु आहे.परंतु कोणतेही काम पूर्ण होत नाही.या महामार्गावर अपूर्ण रस्त्यामुळे रोज होणारे अपघातापासुन सुटका व्हावी यासाठी हा महामार्ग चौपदरीकरण करण्यासाठी पत्रकारांनी रास्ता रोको करून आवाज उठवला या नंतर चौपदरी करणाला मंजुरी मिळाली व या महामार्गाचे कामाला सुरवात करण्यात आली.
मुंबई गोवा महामार्ग हायवे वरील पुई गावा नजिक मोरीचे खोदकाम एक वर्षा पासून करुन ठेवलेले असून आज पर्यंत या मोरीचे काम तसेच रखडले आहे. यामुळे दोन महिन्या पूर्वी फोरव्हीलर गाडी या मोरीच्या खाली गेली होती सुदैवाने या गाडीतील प्रवाश्याचे जीव बचावले परंतु खोदून ठेवलेल्या मोरीच्या बाजूला उपाय योजना म्हणून संबधित खात्याकडून केवळ काठ्या उभ्या करुन त्या दोरीने बांधून ठेवलेल्या आहेत परंतु प्रवाश्यांचे जीव गेल्यावर या मोरीचे काम केले जाईल काय?असा तीव्र संताप प्रवासी वर्गातून तसेच नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.








Be First to Comment