Press "Enter" to skip to content

गुलसुंदे येथील शेती संशोधक मिनेश गाडगीळला कृषीभूषण पुरस्कार जाहीर

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।

राज्य शासनच्यावतीने दीला जाणारा कृषीभूषण पुरस्कार रसायनी गुळसूंदे येथील शेती संशोधक मिनेश मोहन गाडगीळ यांना जाहीर झाला आहे.

मिनेशने शेतीसंशोधनात धान्य टरफलापासुन सेंद्रीय ग्रोथ प्रमोटर व कामपोस्ट इनहॅन्सर यांचे संशोधन व त्यांचा शेतीमध्ये वापर व सेंद्रीय शेती प्रसार यावर संशोधन केले आहे.त्याच्या संशोधनाची राज्य शासनाने दखल घेऊन मिनेशला कृषिभूषण पुरस्कार जाहीर केला आहे.

दरम्यान रसायनी गुलसुंदे येथील मिनेशच्या या यशाचे कौतुक व्हावे यासाठी पंचायत समिती पनवेलच्या वतीने मिनेशचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी सभापती देवकी निकम, उपसभापती भारत म्हात्रे , गटविकास अधिकारी लता मोहीते,विस्तार अधिकारी घरत,माजी उपसभापती वसंत काठावले, पंचायत समिती सदस्य काशीनाथ पाटील,जगदीश पवार,वृषाली दशेकर, मनीषा मोरे,स्वप्निल भूजंग, राज पाटील, रत्नप्रभा घरत,तनूजा टेंबे, रेखा म्हात्रे, भूपेंद्र पाटील, श्रावण भल्ला व तालुका कृषी अधिकारी चौधरीसाहेब व त्यांचे सहकारी उपस्थित होते.मिनेशला कृषिभूषण पुरस्कार जाहीर झाल्याने त्याचे सर्वं थरातून अभिनंदन होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.