श्री गुरुवर्य रत्नाकरबाबा चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम
सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।
श्री गुरुवर्य रत्नाकरबाबा चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने (शासनमान्य)सचिव तथा उपसरपंच मोहन लबडे यांच्या वाढदिवसानिमित्त रसायनीतील पत्रकार राकेश खराडे व गणेश रत्नाकर गुरुजी यांच्यावतीने कोरोना पाश्र्वभूमीवर नागरिकांचे काहिअंश संरक्षण व्हावे यासाठी परीसरात ठिकठिकाणी मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.


यावेळी उघड्यावर राहणा-या नागरिकांना,नाका कामगारांना, आदीवासी बांधवांना तसेच मोहोपाडा बाजारपेठेत बाजारहाट करणा-या नागरिकांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी रसायनी परीसरात कोरोना रोखण्यासाठी तरुणांनी जनजागृती केली.तसेच नागरिकांनी कोरोना हद्दपार करण्यासाठी स्वतःचे व आपल्या कुटुंबियांचे संरक्षण करावे असे आवाहन श्री गुरुवर्य रत्नाकरबाबा चॅरिटेबल ट्रस्टचे (शासनमान्य) सदस्य पत्रकार राकेश खराडे यांनी केले आहे.








Be First to Comment