Press "Enter" to skip to content

पेण तालुक्यातील 2 हजार विज ग्राहकांची बत्ती गुल

20 हजार ग्राहकांकडून 8 कोंटी च्या वर वसुलीची थकबाकी

सिटी बेल । पेण । वार्ताहर ।

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने थकीत वीज बिलांविरोधात मोहिम आखली असता या मोहिमेस तालुक्यातील नागरिकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. पेण तालुक्यातील 58 हजार 220 वीज ग्राहक असून त्यातील मागे सहा महिन्यातील 19 हजार 995 वीज बिले वेळेवर न भरल्याने थकित ग्राहक राहिले. त्यांच्याकडून आतापर्यंत 10 कोटी 32 लाख 11 हजार 171 थकीत विज बिलांची वसुली झाली असून अजून 8 कोटी 2 लाख 44 हजार 892 रुपये वसुली करायची शिल्लक आहे या दरम्यान तालुक्यातील 1 हजार 989 घरगुती ग्राहकांचे व 389 व्यापारी ग्राहकांचे वीज बिल कनेक्शन बिल न भरल्यामुळे कट करण्यात आले असल्याची माहिती महावितरणाच्या विभागांनी दिली आहे.

पेण तालुक्यातील वाणिज्य, घरगुती आणि सार्वजनिक वीज बिलापोटी असलेल्या सुमारे 18 कोटी 34 लाखाच्या थकीत रकमेपैकी मार्च अखेरीस सक्तीच्या सवलतीत 10 कोटी 32 लाख 11 हजार 171 रुपयांची वसुली करण्यात पेण महावितरणला यश आले आहे. तर वीज बिल चोरी करणारे 75 प्रकरणे उघडकीस आली असून त्यांच्याकडून 17 लाख 77 हजार 600 रुपयांची कायदेशीर वसुली करण्यात आली आहे.

राज्यात कोरोनाच्या कालातील वीज बिले माफ करण्यात यावीत अशी मागणी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात होत होती मात्र सरकारने याकडे दुर्लक्ष करीत नागरिकांनी वापरलेली वीज बिले तात्काळ भरावी कोरोनाच्या काळातील पेण तालुक्यांमध्ये महावितरण विभागाची सुमारे 18 कोटी 34 लाखांची वीज बिले थकीत आहेत यामध्ये शहरी-ग्रामीण ग्रामपंचायतच्या दिवाबत्ती चे घरगुती आणि इतर वीजबिलांचे थकीत वसुली करण्यासाठी महावितरणातील वरिष्ठांच्या आदेशानुसार पेण महावितरणचे अधिक्षक अभियंता दिपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता उमाकांत सपकाळे, कार्यकारी अभियंता के. सी. भिसे, सहाय्यक अभियंता बी.बी. जाधव, एस.ए. उमप, डी. एस. पाटील, ए.व्ही. थोरात, एस. एन. कुरणावळ, ए.के. साळवी, बी. जे. नाईक, ए. व्ही. वानखेडे, कनिष्ठ अभियंता एस. सी. भोनकर, जे.डी.गायकर आदि कर्मचारी यांनी या मोहिमेत सहभाग घेतला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.