मनसेचे दिपक कांबळी यांच्या पाठपुराव्याला यश
सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।
कोरोनामुळे उदभवलेल्या लाॕकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तसेच उद्योग धंदे बंद झाल्यामुळे कोरोना महामारीत आर्थिक परिस्थिती खुपच बिकट झाल्याने सर्वसामान्यांना शालेय फी भरणे शक्य नव्हते.हि बाब लक्षात घेऊन मोहोपाडा येथील प्रिआ स्कुल ( इंग्रजी माध्यम ) पालक संघटनेचा फी शुल्क कमी करण्याकरीता मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक कांबळी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले होते.
दि ५ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रिआ स्कुल कमीटी बरोबर पहिली चर्चा झाली होती.प्रिआ स्कुलमध्ये २००० विद्यार्थी आहेत.त्यावेळेस इतर मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या परंतु फी सवळतीबाबत निर्णय झाला नव्हता.अनेक दिवसांच्या पाठपुराव्यानंतर दि.२/४/२०२१ रोजी एकुण वार्षिक फी मध्ये २५% सवळत देण्याचे ठरविण्यात आले.हा निर्णय पालकसंघटनेच्या वतीने मान्य करण्यात आला.सदर फी ही ३० मे २०२१ पर्यत भरावयाची आहे.प्रिआ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले की प्रिआ स्कुल ही शाळा ना नफा ना तोटा या तत्वावर चालवण्यात येत आहे.
शासकीय प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे अनुदान किंवा मदत मिळत नसतानाही फी चे प्रमाण कमी ठेवूनही शालेने चांगला नावलौकिक कमावला आहे.या शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी देशात व परदेशातही चांगले नाव कमावत आहेत.या शालेमध्ये परिसरातील सर्व सामान्य नागरिकांच्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न राहिला आहे.सदर विषयामध्ये प्रिआ संस्थेच्यावतीने पाताळगंगा रिलायन्स कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट विनायक परांजपे ,थरमॕक्स कंपनीचे कदम ,सिप्ला कंपनीच्या सौ.उल्का धुरी,बकुल कंपनीचे पैई, मुख्याध्यापिका जोसी जोसेफ मॕडम,गुरव,त्याचप्रमाणे पालकांच्यावतीने दिपक कांबळी यांच्यासोबत संजय पाटील,प्रशांत खरात,भास्कर डुकरे,अरुण महाडीक,राकेश खराडे,प्रविण ठाकुर,संतोष म्हात्रे,निलेश बाबरे,मंगेश पाटील,भानुदास जांभळे उपस्थित होते.लाॕकडाऊनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून प्रिआ प्रशासनाने हायकोर्टाचा संपुर्ण फी भरा असा निकाल असतानाही सुध्दा २५% फी मध्ये सवलत दिल्याबद्दल आभार तसेच मनसेचे दिपक कांबळी यांनी फिमध्ये सवदत मिळवून देण्यास अथक परिश्रम तसेच पाठपुरावा केल्याबद्दल पालकांच्यावतीने प्रिआ स्कुल प्रशासन,दिपक कांबळी यांचे आभार मानले आहे.










Be First to Comment