रिस विभागात विकासकामांचा आलेख चढा
सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।
रिस विभागासह आसपासच्या परिसरात माजी सरपंच कृष्णा पारंगे यांच्या प्रयत्नशील नेतृत्वाखाली पंचायत समितीच्या माजी सभापती कांचन पारंगे यांच्याकडून विकास कामांचा धुमधडाका सुरुच असून रिस विभागात नागरिकांकडून दोघा पती-पत्नीकडून कौतुकास्पद काम करीत असल्याचे बोलले जात आहे.
परीसराच्या विकासासाठी विविध उपक्रम हाती घेवून यशस्वीरित्या वाटचाल करत असताना विकासकामे होताना नागरिक मतदार पाहत आहेत.रिस स्मशानभूमी , ठिकठिकाणी रस्तालगतचे हायमास्ट , अंतर्गत गटारे,रस्ते आदी विकासकामे झाली असून नागरिकांसमोर विकासाबाबत कोणतीही समस्या निर्माण होवू नये यासाठी या दोघा पती-पत्नीची धडपड सुरू असते.रिस गावात भव्य मंदिर साकारले जात असून या मंदिरासमोर सभामंडप व्हावे यासाठी दोघा पती-पत्नीने पंचायत समिती सभापती वृशाली पाटील यांच्याकडे मागणी केली.
यावेळी सभापती वृशाली पाटील यांनी पंचायत समिती फंडामधून रिस सभामंडपासाठी दहा लाखांचा निधी उपलब्ध करून दिला व त्याची प्रमा रिस ग्रामस्थांना सुपूर्द केली.या सभामंडप कामाचे भूमिपूजन सभापती वृशाली पाटील व माजी सभापती कांचन पारंगे, सरपंच ताईं पवार यांच्याहस्ते करण्यात आले.तसेच रिस जिल्हा परिषद शाळेसमोर हायमास्टचे उदघाटन करण्यात आले.यावेली रिस येथे मुख्य कनेक्शन ते रिस गाव पाईंप लाईनचे उदघाटन करण्यात आले.तसेच रिस अंतर्गत गटार तयार करण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.याप्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने किर्तनकार हभप महादेव महाराज मांडे यांनी रिस परीसरातील विकास कामांची स्तुती करून धन्यवाद दिले.


याप्रसंगी सभापती वृशाली पाटील, माजी सभापती कांचन पारंगे, सरपंच ताई पवार, माजी सरपंच कृष्णा पारंगे,माजी सरपंच लक्ष्मण पारंगे, किर्तनकार हभप महादेव महाराज मांडे, ग्रामपंचायत सदस्या माधुरी जांभले, श्वेता कांबळे, दिलीप पारंगे, पांडुरंग पारंगे, प्रकाश पाटील,श्याम म्हस्कर, नामदेव कोकंबे, अजय म्हस्कर, संतोष पारंगे,बालाराम जांभले, विकास पारंगे,अशोक पारंगे, भगवान जांभले, पुंडलिक पवार,संजय कांबळे, रमेश कोकंबे,मुकूंद जांभले, जयंता पारंगे, विठ्ठल म्हस्कर,हभप गणू पारंगे, रघुनाथ कोकंबे,मुकूंद जांभले, जयंता पारंगे,हभप विठ्ठल म्हस्कर,हरी राठोड, देविदास मुकादम,हभप रघुनाथ पारंगे,हभप गणेश ठोंबरे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन संतोष चौधरी यांनी पाहिले.








Be First to Comment