सिटी बेल । काशिनाथ जाधव ।
पाताळगंगा ।
खालापूर तालुक्यातील माजगांव,आंबिवली गावातील असलेल्या मुलांने नुकताच ( CMA ) ची परिक्षा दिली असून उत्तम यश संपादन केल्यामुळे ग्रामस्थांच्या माध्यमातून त्यांस शाळ,श्रीफळ,पुष्प गुच्छ देवून सन्मानित करण्यात आले.
विशेष म्हणजे या परिसरातील प्रथमच या मुलांने मोठी पदवी प्राप्त केल्यामुळे भगवान जाधव – सामाजिक कार्यकर्ते, रमेश जाधव,ग्रूप ग्राम पंचायत माजगांव सदस्य,मिनल जाधव – उप सरपंच, एस.के.कांबळे,अरुण जाधव,अर्चना ढवळकर – सदस्या,सरिता लभडे सदस्या,मंगेश लभडे,या सर्वांनी त्यास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
त्यांचे शालेय शिक्षण रायगड जिल्हा परिषद शाळा माजगांव,तसेच डॉ.पारनेर महाराज विद्यालय वाशिवली. नंतर खोपोली येथे शिक्षण घेवून पुढील शिक्षणांसाठी पुणे येथे घेतले.सलग दोन वर्ष येथे शिक्षण घेत असतांना कोणत्याही परीक्षेत तो उत्तम गुणांने यशस्वी होत असल्यामुळे ( CMA ) च्या परीक्षेत त्यांनी उत्तम गुण प्राप्त करून आपल्या गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.
मुलांला शिक्षणांचे बाळकडू त्यांच्या वडीलांकडून मिळाले असून वडील रमेश ढवाळकर – ग्राम पंचायत सदस्य ,खालापूर तालुका खुस्ती सरचिटणीस म्हणून पदावर काम करीत आहे.तसेच आई रेश्मा ढवाळकर पोलीस पाटील म्हणून काम करीत आहे.आपल्या मुलांनी खूप शिकावे ही संकल्पना त्यांच्या मनामध्ये रुजविण्यात आल्यामुळे आज त्यांनी दोन मुले शिक्षण घेवून आकाशाला गवसणी घातली आहे मुलगी इलेक्ट्रॉनिक इंजिनियरींग झाली असून मुलगा (CMA ) झाल्यामुळे वडीलांचा आनंद ओसांडून वाहत आहे.








Be First to Comment