Press "Enter" to skip to content

खालापूर शिवसेनेच्या उपतालुकाप्रमुखपदी प्रविण पाटील यांची निवड

सिटी बेल । काशिनाथ जाधव ।
पाताळगंगा ।

खालापूर तालुक्यातील आगामी काळात होणाऱ्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून सर्वच तालुक्यात राजकीय पक्षानी मोठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून तालुक्यात शिवसेनेने काही निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना संधी आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात येत असल्याने चिंचवली गोहे येथील निष्ठावंत शिवसैनिक प्रविण पाटील यांची शिवसेना खालापूर उपतालुकाप्रमुखपदी निवड केल्याने त्या आशयाचे नियुक्तीपत्र आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह इतर पदाधिकारी वर्गाच्या हस्ते पाटील यांना आमदार निवासस्थानी कार्यालयात देण्यात आल्याने प्रविण पाटील यांना पुढील वाटचालीकरीता सर्व स्तरावरून अभिनंदन वर्षाव होत आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिवार्दाने, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने तसेच शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख दत्ताजी दळवी, जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर तालुक्यात शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली असुन कार्यकर्त्यांना शिवसेना पक्षात आकर्षित करण्यासाठी चांगलीच कंबर कसली असल्याने पक्ष वाढीसाठी निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विशिष्ट पदावर संधी देत नवनवीन पद जाहीर करण्यात येत असल्याने चिंचवली गोहे येथील जेष्ठ शिवसैनिक प्रविण पाटील याची शिवसेना खालापूर उपतालुकाप्रमुखपदी निवड करण्यात आल्याने त्या आशयाचे पत्र प्रविण पाटील यांना आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते देण्यात आले आहे.

तसेच याप्रसंगी आमदार महेंद्र थोरवे, शिवसेना तालुका प्रमुख संतोष विचारे, माजी उपसभापती जनार्दन थोरवे, रायगड जिल्हा सल्लागार शशिकांत देशमुख, पंचायत समिती विभागप्रमुख चिंतामण चव्हाण, साजगांव ग्रा.पं.माजी उपसरपंच निलेश पाटील, जेष्ठ नेते गणेश पाटील, शाखाप्रमुख नितेश पाटील, जिल्हा परिषद विभाग अधिकारी मयूर पाटील, शिवाजी पालकुडतेवार, रणजित पाटील, धीरज पाटील, सागर भोर्डे आदि मान्यवर उपस्थित होते. तर प्रविण पाटील यांनी शिवसेना उपतालुकाप्रमुख पदावर निवड झाल्यावर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, उपतालुका प्रमुख म्हणुन मी पक्ष संघटनेत सर्वांना बरोबर घेवुन निष्ठेने काम करेन तसेच तालुक्यात शिवसेनेला उभारी देण्यासाठी मी यशस्वी प्रयत्न करून तळागाळातील नागरिकांपर्यत शिवसेना पक्ष पोहचवून तालुक्यात शिवसेनेची भक्कम बांधणी करून पक्ष संघटनेला अधिक बळकटी देऊन पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनेतेचे प्रश्न मार्गी लावेन असे मत नवनिर्वाचित उपतालुकाप्रमुख प्रविण पाटील यांनी व्यक्त केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.