सिटी बेल । रोहा । समीर बामुगडे ।
रोहा येथील अल्पसंख्याक समाजाच्या महिला सौ. सनोबर सफदर गजगे यांच्यावर रोहा नगर पलिके तर्फे झालेल्या अन्यायाबाबत रोहा प्रांताधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
रोहा नगरपालिकेकडे सौ. सनोबर सफदर गजगे यांनी मालकीच्या मालमतेस कर प्रणाली असेसमेंटमध्ये त्यांच्या नावाची नोंद करण्यासाठी ५ फेब्रुवारी २०२० रोजी अर्ज केला होता. रोहा नगर पालिकेने त्या अर्जास एक वर्ष होऊन गेला आहे काही ही कारवाई केली नव्हती. त्या अर्ज निमित गेले ती महिला वर्षभर रोहा नगरपालिकेच्या त्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होत्या परंतु नगरपालिकेकडून सुनवाणी घेण्यासाठी वारंवार नोटीस काढण्यात आली होती प्रत्येक वेळी काहीतरी थातुर मातुर निमित्त पुढे करायचे आणि वेळढकळुपणाचे कार्य करायचं आणि त्या महिलेला पूर्ण सूचना न देता सुनवाणी रद्द केली जात होती .
ती महिला गेले वर्षभरात नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती व अर्ज निकाली काढण्यासाठी कित्येक वेळेला लेखी तोंडी विनंत्या केल्या आहेत. परंतु तिच्या अर्जावर कोणताही निर्णय न देता अर्ज निकाली काढण्यासाठी टाळाटाळ केली जाते असे याच कारणामुळे त्या महिलेस खुप मानसिक त्रास झाला होता असे रोहा येथील मुस्लिम अल्पसंख्याक समाजाची एक महिला सौ. सनोबर सफदर गजगे यांचे म्हणणे आहे.
रोहा नगरपालिकेच्या या प्रवृत्तीमुळे त्या महिले ने रोहा नगरपालिकेच्या अंदाधुंदी कारभाराच्या विरोधात २६ जानेवारी २०२१ रोजी सौ. सनोबर गजगे यांनी आमरण उपोषणाचा इशाराही दिला होता. त्यानंतर नगराध्यक्षांनी याप्रकरणी योग्य त्या कारवाईचे आश्वासन दिल्यामुळे सदर उपोषणाला स्थगिती देण्यात आली होती . परंतु त्यानंतर आजपर्यंत नगरपरिषदेकडून त्या महिलेला न्याय दिलेला नाही . त्या महिला न्याय ऐवजी आज ही नगर पालिके कडून अन्याय केला जात आहे .
त्या महिलेने पूर्वीही रोहा नगर पालिकेच्या निर्दशनास आणून दिले आहे कि सिटी सर्वे न. २५६ वडिलोपार्जित मालमत्ता आहे , या मालमत्ते प्रॉपर्टी कार्ड नुसार ५ भाऊ व १ बहीण असे ऐकून ६ वारस आहेत , या मालमत्तेत ऐकून ६ सदनिका बांधण्यात आले आहेत व त्या फैकी ५ सदनिकेच्या अस्सीसमेंट मध्ये ५ भावांचे नावे २००९ मध्ये नोंद केले आहेत, या मालमत्तेत १ सदनिकेचे बांधकाम साधारण डिसेंबर २०१९ मध्ये पूर्ण झाले त्यानुसार त्या महिलेने रोहा नगर पालिकेस दिनांक ०५ फेब्रवारी २०२० रोजी असिसीमेंट मध्ये माझे नाव नोंदवण्यास अर्ज दिला होता,
ज्या नियमा प्रमाणे ५ असिसीमेंट धारकाची नावे लावले आहेत त्याच नियम नुसार त्या महिले चे नाव सदनिका क्र ०३ वर लावणे अपेक्षित आहे , परंतू रोहा नगर परिषदेने तसे न करता फक्त त्या महिलेच्या सदनिका क्रमांक 3 वर सर्वांचे नावे लावले आहेत . इतर 5 सदनिकेत सर्वांचे नावे न लावता इतर भावांची वेगवेगळी नावे लावली आहेत त्या मुले त्या महिले वर अन्याय होत आहे . ५ लोकांसाठी एक कायदा आणि त्या महिले साठे वेगळा कायदा का ?
त्या महिलेने मागणी केली आहे की
जर वरील असेसमेंट धारकांचे नवे नियम बाहय किंवा चुकीच्या पद्धतीने लागले असतील तर ती चूक दुरुस्त करावी व सर्व सहा ही सदनिकांवर प्रॉपर्टी कार्ड नुसार सर्वांची नावे एकाच वेळी लावण्यात यावी अशी मागणी केली आहे .
तसेच सदर इमारती चे बांधकाम साधारण २००४ पासून सुरू होते . आणि त्या इमारतीचे नगर नगर पालिका ने २००९ पासून ५ सदनिकांचे कर अधिकृत दराने अकरणे आहेत . फक्त त्या महिलेचा फ्लॅट अनधिकृत घोषित करून अनधिकृत दराने कर भरण्यास सांगितले आहे .त्या महिलेचा फ्लॅट पहिल्या मजल्यावर आहे . रोहा नगर पालिका ने दुसऱ्या मजल्याचा कर अधिकृत दराने गेले १० वर्षे आकारला आहे .
तळ मजल्यावर २ फ्लॅट अधिकृत, दुसऱ्या मजल्यावर २फ्लॅट अधिकृत पहिल्या मजल्यावर एक फ्लॅट अधिकृत तर दुसरा त्या महिलेचा पहिल्या मजल्यावर चा फ्लॅट अनधिकृत कसा?
या वरून रोहा नगर पालिकेत गलथळ कारभार दिसून येत आहे असे सौ. सनोबर सफदर गजगे यांनी आमच्या पत्रकारांशी बोलताना सांगितले .
दरम्यान, याप्रकरणी रोहा प्रांताधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी रोहा प्रांताधिकारी काय कारवाई करतील हे महत्वाचे ठरणार आहे.








Be First to Comment