सिटी बेल । पनवेल । संजय कदम ।
पनवेल रेल्वे स्थानकामध्ये भेटायचे ठरवून घराबाहेर पडलेले दोन मित्र त्यानंतर बेपत्ता झाल्याने पनवेलमध्ये खळबळ माजली आहे.
फिर्यादी नितीन भोइटे याचे मामा सुहास दगडू कांबळे (52) अंगाने मजबूत, उंची 5 फूट 5 इंच, रंग गोरा, केस काळे, नाक सरळ असून अंगात सफेद रंगाचा फुल शर्ट व फुल पॅन्ट, गळ्यात तुळशीची माळ, पायात काळ्या रंगाची चप्पल आहे. तर त्यांचा मित्र विठ्ठल राम जाधव (40) अंगाने मध्यम उंची 5 फूट 5 इंच, रंग सावळा, नाक सरळ, केस काळे, डोळे काळे असून अंगात शर्ट पॅन्ट घातलेले आहे. हे दोघे पनवेल रेल्वे स्थानक येथे भेटणार होते. परंतु त्यानंतर ते कुठेतरी निघून गेल्याने या संदर्भात ते हरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास दूरध्वनी 27452333 किंवा पो.ना.एस.ए.वाघमारे यांच्याशी संपर्क साधावा.








Be First to Comment