Press "Enter" to skip to content

आपट्यात कोळी बांधवांकडून होड्यांच्या व पोहण्याच्या शर्यंती

सिटी बेल । रसायनी । राकेश‌ खराडे ।

रसायनी परीसरातील आपटा कोळी बांधवांकडून पाताळगंगा आपटा नदिपात्रात होड्यांच्या शर्यती पार पडल्या.या स्पर्धेत चार होड्या सामील झाल्या होत्या.हि शर्यंत श्री गणपती मंदिर ते श्री बापुजी मंदिर यानंतर पुन्हा श्री गणपती मंदिर अशी झाली.या होड्या शर्यंतीत पहिला क्रमांक जगन पाटील ग्रुपने पटकाविला तर दुसरा क्रमांक पदा घासे ग्रुपने पटकाविला.तसेच यावेळी पाताळगंगा नदिच्या आपटा पात्रात पोहण्याच्या शर्यंतीचे आयोजन करण्यात आले होते.

पोहण्याच्या या स्पर्धेत बंटी सावंत याने पहिला क्रमांक मिळविला तर प्रेम भोईर हा दुसरा आला.यावेली होडी शर्यंत आणि पोहण्याच्या शर्यंतीतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिक देण्यात आले.पातालगंगेच्या आपटा नदिपात्रात या शर्यंती दोन तास सुरू होत्या.या कार्यक्रमाला मान्यवर म्हणून शंकर भोपी(अध्यक्ष, मच्छीमार सोसायटी), यशवंत भोईर (उपाध्यक्ष मच्छीमार सोसायटी),सरपंच निकीता दर्शंन भोईर, मयुर शेलार, व आजी माजी पंच कमिटी उपस्थित होते.या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपटा कोली समाजाचे गणेश भोईर व नरेश शेलार यांनी केले.

More from क्रिडाविश्वMore posts in क्रिडाविश्व »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.