Press "Enter" to skip to content

बारवई आदीवासीवाडीच्या खोलंबलेल्या रस्त्याचे काॅक्रीटीकरण : आदीवासीबांधवांत समाधान

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।

बारवई ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील आदीवासी वाडीकडे जाणा-या रस्त्याचे काम कित्येक वर्षे खोलंबल्याने या रस्त्याला मुहूर्त कधी मिळणार ?असा सवाल निर्माण झाला होता.यासाठी आदीवासी बांधवांनी सामाजिक कार्यकर्ते निलेश बाबरे यांच्याकडे मागणी केली होती.

निलेश बाबरे यांनी बारवई आदीवाडीचा रस्ता करण्यासाठी प्रयत्न करुन जिल्हा परिषद सदस्य राजू पाटील यांच्याकडे जिल्हा परिषद योजनेतून रस्त्याचे काम करण्याची मागणी केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजू पाटील यांनी समाज कल्याण योजनेतून निधी उपलब्ध करून दिला.तर रस्त्यासाठी काही जागेकरीता वामन गोजे व गणू गोजे यांनी सहकार्य केल्याने अखेर बारवई आदीवाडीच्या रस्त्याला मुहूर्त मिळाला.या दिडशे मीटर रस्त्याच्या काॅक्रीटीकरण भुमीपुजन कामाचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्य राजू पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी सरपंच अॅड.नियती निलेश बाबरे,उपसरपंच ललिता वामन पडवल, ग्रामपंचायत सदस्या किर्ती सुमित दलवी,अमीर वाघमारे, प्रतिक्षा दिपक तारे, उषा किसन वाघमारे, रुपाली सुनिल मुंडे आदीसह ग्रामस्थ व आदीवासी बांधव उपस्थित होते.बारवई आदीवासीवाडीतील अनेक वर्षे खोलंबलेल्या रस्त्याचे काॅक्रीटीकरण सुरू झाल्याने आदीवासीबांधवांच्या चेह-यावर समाधानाचे वातावरण दिसून आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.