Press "Enter" to skip to content

किल्ले रायगड ते श्रीवर्धन शिवज्योत : शिवजयंती श्रीवर्धनमध्ये जल्लोषात साजरी

सिटी बेल । रायगड । अमूलकुमार जैन ।

श्रीवर्धन शहरातील शिवजयंती उत्सव समिती आयोजित शिवजयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सर्व योग्य ती खबरदारी घेत तरुणाईने शिवजयंती साजरी केली. शहरातील पंधरा तरुणांनी किल्ले रायगड ते श्रीवर्धन जवळपास 90 किमीचे अंतर पायी चालत शिवज्योत आणली .

शहरातील विविध ठिकाणी शिव ज्योतीचे सुहासिनी नी यथायोग्य पूजन करत स्वागत केले. दरवर्षीप्रमाणे मराठा समाजाने शहराच्या प्रवेशद्वाराजवळ शिव ज्योतीचे स्वागत व पूजन केले. त्यानंतर शहरातील शिवाजी चौकामध्ये शिवरुद्र कराटे अकॅडमी च्या विद्यार्थ्यांनी शिव ज्योतीला मानवंदना देत शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर केले .

त्यामध्ये तलवारबाजी लाठी काठी, बनाटा, दांडपट्टा , चक्र अशा विविध शस्त्रांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. सदर प्रसंगी महिलांनी लाठी काठी व तलवारबाजीचे प्रात्यक्षिके सादर केली . डॉक्टर मधुकर ढवळे, काशिनाथ गुरव, राजू भोसले, शिवा चाफेकर व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी गेली अनेक वर्ष शिव ज्योतीची परंपरा श्रीवर्धन मध्ये रुजवली व वाढवली आहे .

सदर प्रसंगी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष पांडुरंग चौले, प्रीतम श्रीवर्धनकर, अनंत गुरव, अमर गुरव व इतर सभासद उपस्थित होते. श्रीवर्धन पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक उमेंद्र खिराड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दलाने चोख बंदोबस्त ठेवला.

शिवजयंती उत्सव प्रत्येक तरुणासाठी ऊर्जेचा स्रोत आहे. शिव ज्योतीची परंपरा डॉक्टर मधुकर ढवळे व आम्ही तरुण अनेक वर्षा पासून जोपासत आहोत. यावर्षी कोरोनामुळे असंख्य अडचणी निर्माण झाल्या मात्र तरुणांनी सर्व अडचणींवर मात केली आहे. शासनाने निर्देशित केलेल्या सर्व सूचनांचे पालन केले आहे…

काशिनाथ गुरव

( तरुण श्रीवर्धन )

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती नियमांचं पालन करत अतिशय साध्या पद्धतीने शिवजयंती उत्सव साजरा केला आहे.

पांडुरंग चौले, अध्यक्ष शिवजयंती उत्सव समिती श्रीवर्धन)

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.