सिटी बेल । याकूब सय्यद । नागोठणे ।
नागोठणे येथील अबॅकस च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र राज युवा पत्रकार संघाच्या पदाधिकार्यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला यामध्ये महाराष्ट्र प्रमुख राज वैशंपायन पत्रकार याकूब सय्यद महिला जिल्हाप्रमुख मंजुळा म्हात्रे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार संपन्न झाला.
दिनांक 7 फेब्रुवारी व 21 फेब्रुवारी रोजी झालेल्या दिल्ली येथे ऑनलाईन स्पर्धेमध्ये नागोठण्यातील 16 मुलांनी सहभाग नोंदवला होता त्यात एक पंधरा मिनिटांमध्ये 250 गणित आणि नऊ मिनिटांमध्ये 200 गणिते सोडवण्याचे आव्हान विद्यार्थ्यांसमोर होते त्यात मुलांनी अथक परिश्रम करून बक्षिसांची लयलूट केली यामध्ये प्रज्ञा जाधव हीने दोन्ही राऊंडमध्ये तिसरं पारितोषिकप्राप्त केले युवांश जैन याने प्रथम पारितोषिक पटकाविले तसेच मोनालिसा नाईक हीने दुसरे व पहिले पारितोषिक पटकाविले असावरी दळवी हीने पहिले व दुसरे पारितोषिक पटकाविले गौरी मोदी हिने पहिले पारितोषिक पटकाविले नेहल दुबे हीने पहिला राऊंड मध्ये उत्कृष्ट पारितोषिक पटकाविले पलक दुबे हीने पहिल्या राऊन्ड मध्ये उत्कृष्ट पारितोषिक पटकाविले गवळी स्नेहल येणे पहिल्या राऊंड मध्ये उत्कृष्ट पारितोषिक पटकाविले.
अशी दमदार कामगिरी या मुलांनी केली यामध्ये रिशीकर वनगे निपुर मेंगाळ जियान जैन अभिज्ञा राय रिद्धिमा शहासने नक्ष जैन लक्ष्मण राय दूर्वा शिंदे या मुलांना मॅडल देऊन गौरवण्यात आले राजेश्वर लर्निंग सेंटरच्या नवीन शाखेचे पाली सुधागड येथे ही अनावरण होणार असल्याची माहिती शिक्षिका राजश्री बोळके यांनी कार्यक्रमाच्या वेळी सांगितले तसेच या कार्यक्रमाचे शेवटी आभार सौ. नीलिमा दप्तरदार यांनी मानले








Be First to Comment