पत्रकार लक्ष्मीकांत ठाकूर यांना मातृशोक
निर्मला मारुती ठाकूर यांचे वृद्धापकाळने निधन
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे सदस्य तथा साई श्रद्धा नेटवर्क चे धडाडीचे पत्रकार लक्ष्मीकांत ठाकूर यांना नुकताच मातृशोक झाला आहे. त्यांच्या मातोश्री निर्मला मारुती ठाकूर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. निधना समयी त्या ७२ वर्षांच्या होत्या.
२६ मार्च रोजी निर्मला ठाकुर यांनी अखेरचा श्वास घेतला. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते कै. मारुती रघुनाथ ठाकूर यांच्या त्या पत्नी होत्या. मृत्यूसमयी कुडावे येथे त्या वास्तव्यास होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून,नातवंडे, दोन भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे.
त्यांचा दशक्रिया विधी उद्धर रामेश्वर पाली येथे ४ एप्रिल रोजी पार पडणार आहे.तर १३ व्या दिवसाचे विधी कुडावे येथील निवासस्थानी संपन्न होणार आहेत.







Be First to Comment