Press "Enter" to skip to content

शिवसेना द्रोणागिरी शहर शाखेचे मोठया उत्साहात उद्घाटन

शाखेतून सर्व-सामान्य नागरिकांची कामे होतील : माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी व्यक्त केला विश्वास

सिटी बेल । उरण । सुनिल ठाकुर ।

संकष्टी चतुर्थी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा योग साधून शिवसेना द्रोणागिरी शहर शाखेचा उद्घाटन सोहळा जिल्हाप्रमुख मा. आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. अत्यंत साध्या पद्धतीने प्रमुख पदाधिका-यांच्या उपस्थितीत कोराना चे नियम पाळून कार्यक्रम हा कार्यक्रम पार पडला.

द्रोणागिरी शहर शाखेचे उद्घाटक मा.आमदार जिल्हाप्रमुख मनोहर शेठ भोईर मार्गदर्शन करताना म्हणाले की, शहरात येणारे लोक यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड या सारख्या अतिशय साध्या साध्या समस्या असतात त्या आपण जरी सोडविल्या तरी ते निश्चितच सेनेला मतदान करतात.

जेएनपीटी चे विश्वस्त मा. जिल्हाप्रमुख दिनेश पाटील यांनी सांगितले की, माझा पण येथे फ्लॅट असून मीही द्रोणागिरी शहराचा रहिवाशी आहे. तेव्हा माझीही नजर तुमच्या कार्यावर असेल. यावेळी उपजिल्हाप्रमुख नरेश राहाळकर, तालुका संघटक बी. एन .डाकी, महिला तालुका संघटक सौ. भावना म्हात्रे यांची ही भाषणे झाली. जगजीवन भोईर यांची द्रोणगिरी शहरप्रमुख पदावर नियुक्ती झाल्याबद्दल प्रमुख पदाधिका-यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला तालुका संपर्क प्रमुख जे. पी. म्हात्रे, शहर संपर्क प्रमुख गणेश म्हात्रे,पंचायत समिती सदस्य हिराजी घरत, उपतालुका प्रमुख कमलाकर पाटील, शिक्षक सेनेचे कोकण कार्याध्यक्ष कौशिक ठाकूर, कामगार नेते महादेव घरत, गणेश घरत,घारापुरी सरपंच बळीराम ठाकूर युवा सेनेचे निशांत घरत, डोंगरी शाखाप्रमुख सचिन पाटील, फुंडे गाव उपाध्यक्ष शिवेंद्र म्हात्रे, किसनशेठ म्हात्रे, नवीन शेवा मा. शाखाप्रमुख निलेश भोईर, धनाजी भोईर, भुपेंद्र भोईर, मनोहर दर्णे आदिनाथ पडते, व कार्यकर्ते उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार उप तालुका संपर्क प्रमुख के. एम. घरत यांनी मानले, कार्यक्रमाला नव तरूण इंजिनिअर उपस्थित होते ज्यांनी कार्यक्रमाची व्यवस्था पाहीली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.