शिवप्रेमींनी मशाल ज्योत पेटवत केला जयघोष
सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।
कुळवाडी भूषण जगविश्वविख्यात छत्रपती शिवाजी महाराज हे अखिल महामानव जातीचे उद्गाते होय सर्व धर्म समभाव समतेचे प्रतीक म्हणून लौकिक मिळवलेल्या एकमेव उद्वितीय छत्रपती शिवरायांची शिवजयंती भारत वाशीयांचा राष्ट्रीय उत्सव आहे आणि या उत्सवाचे औचित्य साधून खांब देवकान्हे विभागातील अनेक शिवप्रेमी मंडळ खांब वैजनाथ येथील सुरगडावर (घेरासुरगड) छत्रपती शिवरायांचा गजर करत तसेच मशाल ज्योत पेटवत जयघोषात केले प्रयाण .
तिथीनुसार संपन्न होत असलेला ३९२ वा शिवजन्मोउत्सव ३१ मार्च (फाल्गुन कृष्ण ३ ) संपन्न होत असून एक आनंददायी उत्साह निर्माण करणारी जयंती कोरोनामुळे संकटामुळे तसेच शासनाच्या प्रशासनाच्या नियम अटी शर्तीमुळे साधेपणाने साजरी करावी लागत असल्याने अनेक शिवप्रेमी युवकांना मशाल ज्योत प्रयाण रायगड किल्ल्यावर जाण्यास सक्त मनाई असल्याने अविरतपणे चालत आलेली शिवजयंतीसाठी ही मशाल ज्योत सुरगड येथून पेटवत राजे छत्रपती शिवराय यांच्या जयघोषात गावातील शिवस्मारका पर्यंत शिवप्रेमी युवकांनी या गडाचा पावित्र्य राखत केला आंदोउत्सव ,

प्रशकीय यंत्रणेचा पालन करत कायदा आणि सुव्यवस्थेची आमलबजावणी करत खांब देवकान्हे विभागातील युवकांनी सोशल डिस्टनचा वापर करत गावदेवी शिवप्रेमी मित्र मंडळ बाहे ,गावदेवी शिवप्रेमी मित्र मंडळ नडवली व उदय व्यायाम मंडळ मुबंईकर सह विभागातील काही मोजकेच शिवभक्त व शिवप्रेमी युवकांनी शिवजयंतीची मशाल ज्योत सुरगड येथून गड दैवता आई आंसाई देवी पूजन करून जय जिजाऊ जय शिवराय म्हणत जयघोषात आणत साधेपणात पण आनंदाने केला शिवजयंती उत्सव साजरा.








Be First to Comment