Press "Enter" to skip to content

गोवे येथे शिवजयंती मोठया उत्सहात साजरी

सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।

रोहा तालुक्यातील गोवे येथे जय हनुमान मित्र मंडळ गोवे येथे शिवजयंती उत्सव मोठया उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.

सकाळी ९.३० वा रायगड किल्ल्याववरून गोवे येथे भव्य मशाल यात्रेचे आगमन,सा.४.००छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीची मिरवणूक,सा.७.०० शिवकालीन मर्दानी खेळ,आयोजित करण्यात आला. यावेळी जय हनुमान मित्रमंडळ यांच्या तर्फे गोवे ग्रामपंचायत सरपंच महेंद्र पोटफोडे, उपसरपंच नितीन जाधव, सदस्य नरेंद्र पवार, सुप्रिया जाधव,रंजिता जाधव, निशा जवके,अंजली पिंपळकर,भावना कापसे,सुमित गायकवाड,यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी जेष्ठ कार्यकर्ते तानाजी जाधव,मा. सरपंच नरेंद्र जाधव, मा. उपसरपंच संदीप जाधव, राजेश शिर्के, राजेंद्र जाधव,लहू पिंपळकर,सुरेश जाधव, मनोहर मांजरे,पांडुरंग जाधव, नामदेव जाधव,बळीराम जाधव, शिक्षक महाडिक सर व ग्रामस्थ,तरुण वर्ग व महिला वर्ग उपस्थित होत्या.

रात्री १०.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने शाळेतील विदयार्थ्यांचे भाषण,रात्री ११.०० वा. सिद्धी सतीश पवार यांचे पावनखिंड या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आला.यानंतर बक्षीस वितरण कार्यक्रम अशा विविध प्रकारचा सोशल डिस्टन्सचे नियमाचे पालन करीत सर्व कार्यक्रम मोठया उत्सहात संपन्न झाला. सर्व कार्यक्रम यशस्वीकरण्यासाठी जय हनुमान मित्रमंडळाचे पदाधिकारी सर्व सदस्य यांनी मेहनत घेतली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.