सिटी बेल । उरण । वैशाली कडू ।
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आजपासून वय वर्ष ४५ वरील प्रसारमाध्यम प्रतिनिधी व त्यांच्या कुटुंबियांसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. उरणमध्ये ही प्रसारमाध्यम यांना लसीकरण करण्यास सुरुवात झाली आहे.
उरणमध्ये याची सुरुवात उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू, माजी अध्यक्ष संजय गायकवाड, पत्रकार वैशाली कडू यांच्या लसीकरणाने झाली.यावेळी इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉ. मनोज भद्रे व इतर आरोग्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

तालुक्यातील सर्व प्रसारमाध्यम प्रतिनिधींना कळविण्यात येते की, शासनाने कोविन पोर्टल अथवा आरोग्य सेतूद्वारे लसीकरण सुविधा सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करुन दिली आहे.
त्यानुषंगाने वय वर्षे ४५ ते ६० च्या दरम्यान असलेले, Comorbid factor असलेले प्रसारमाध्यम प्रतिनिधी तसेच ६० वर्षावरील सर्व प्रसारमाध्यम प्रतिनिधी आणि त्याच प्रवर्गातील त्यांच्या कुटुंबियांकरिता गुरुवार, दि.१ एप्रिल २०२१ रोजी सकाळी १० वाजल्यापासून उरणच्या इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे.
उरणमधील प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयातील संबंधित लसीकरण समन्वय आरोग्य अधिकाऱ्याशी संपर्क साधून आपले व आपल्या कुटुंबियांचे कोविड लसीकरण करुन घ्यावे.

ही लसीकरण मोहीम सध्याच्या लसींच्या उपलब्ध साठ्यानुसार सुरु राहील व लसींचा नवीन साठा उपलब्ध झाल्यावर पुढेही चालूच राहील, कृपया याची प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी नोंद घ्यावी. असे आवाहन इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉ. मनोज भद्रे यांनी केले आहे.








Be First to Comment