सुवर्ण, रजत व कांस्यपदाची लयलूट
सिटी बेल । पाली/बेणसे । धम्मशील सावंत ।
इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनच्या ९ व्या राष्ट्रीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या संघाने नेत्रदीपक कामगिरी केली असून कीर्णाक्षी येवले टॅंडींग व तुंगल या खेळ प्रकारात २ सुवर्णपदक तर अंशुल कांबळे एक सवर्णपदक एक रजतपदक,श्रवन लावंड दोन रजतपदक व यश चिकने एक कास्यपदक स्वयंम पाटिल एक कास्यपदक मिळवले.
इंडोर स्पोर्ट्स स्टेडियम पोलो ग्राउंड श्रीनगर येथे दि.२३ ते ३१ मार्च दरम्यान आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातुन १२६ जणांची महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशनच्या वतीने निवड करण्यात आली होती.


महाराष्ट्रातील खेळाडूंनी १० सुवर्णपदक ९ रौप्यपदक, ३२ कास्यपदक असे एकुण ५१ पदके मिळवून तृतीय चषक मिळवला या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या संघातुन खेळणारी किर्णाक्षी किशोर येवले ही आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक विजेती खेळाडु असून या स्पर्धांमध्ये तिने लौकिकास साजेसा खेळ करत राजस्थान , हरियाणा, मणिपुर या राज्यतील खेळाडुंचा पराभव करून (स्टॅडींग फाईट) प्रकारात सुवर्ण पदक तसेच मध्यप्रदेश,दिल्ली, ओडीसा , हरियाणा या राज्यातील खेळाडुंचा पराभव करीत तुंगल ( सेनी प्रकारात) सुवर्ण पदक मिळवले.
या स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभ इंडियन पिंच्याक सिल्याटचे अध्यक्ष श्री किशोर येवले डायरेक्टर जनरल मोहम्मद इक्बाल जनरल सेक्रेटरी मुफ्ती हमीद यासीन व खजिनदार इरफान भुट्टो यांच्या हस्ते करण्यात आला .
पिंच्याट सिलॅट हा इंडोनेशियन मार्शल आर्ट या प्रकाराचा खेळ असुन तो टँडिंग (फाईट), तुंगल (सिंगल), रेग्यु (ट्रिपल), आणि गंडा (डबल) या चार प्रकारात खेळला जातो. हा खेळ जुदो, कराटे, तायक्वांडो, या खेळांशी साम्य असनारा इंडोनेशियन मार्शल आर्ट्स प्रकारचा खेळ आहे. विद्यार्थ्यांसह युवतींमध्ये हा खेळ लोकप्रिय होत आहे या खेळाला भारतीय युवक कार्यक्रम व क्रिडा मंत्रालय, भारतीय खेळ प्राधिकरण,ऑलिंपिक काउंशिल ऑफ आशिया ,अखिल भारतीय विश्वविद्यालय महासंघ, अखिल भारतीय पोलिस क्रिडा खेळ महासंघ यांच्या या खेळाला मान्यता आसल्यामुळे खेळामधे खेळाडुंना उज्वल भविष्य बनवण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
या खेळाचा केंद्र सरकारने 5% राखीव नोकर भरती मध्ये समावेश केला आहे
श्रीनगर इंडोर स्पोर्ट् स्टेडियम पोलो ग्राउंड येथे ९वी राष्ट्रीय पिंच्याक सिलॅट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये देशभरातुन ३५ राज्यातील २४०० खेळाडू सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्याच्या पिंच्याक सिलॅट संघांची गेल्या १० वर्षांपासून उत्कृष्ट कामगिरी असून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अनेक पदके मिळवून संघ अव्वल स्थानी आहे. या खेळामध्ये अनेक खेळाडूंना आपले भविष्य घडविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. क्रिडा क्षेत्रातील सर्वच स्तरातून महाराष्ट्रातील विजयी खेळाडुंचे अभिनंदन महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र प्रताप सिंग ,खजिनदार मुकेश सोनवणे,अॅड पी.सी पाटिल, अॅड विशाल सिंग,संजीव वरे यांनी केले .








Be First to Comment