Press "Enter" to skip to content

शासनाच्या रात्रीच्या संचार-बंदी चे नियम बसवले धाब्यावर..

हॉटेल व दुकानासह गोरेगाव लोणेरे बाजारपेठा सताड उघडया.. गोरेगाव पोलिस कारवाई करणार का ?

सिटी बेल । माणगाव । प्रमोद जाधव ।

कोरोना च्या दुसऱ्या टप्प्यात माणगांव तालुक्यातील बाधित रुग्णासंख्येचा आलेख चढताच असताना राज्यशासन व जिल्हाधिकारी यांनी कोरोना रुग्णसंख्या वाढत असलेल्या तालुक्यातील बाजापेठा व ग्रामिण भागात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आहे मात्र अटी मध्ये शिथिलता आणुन देखील नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून रात्रीच्या संचारबंदीचे नियम मात्र मोडीत काढत असल्याचे स्पष्ट चित्र माणगांव तालुक्यातील गोरेगाव व लोणेरे बाजारपेठेत दिसून येत आहे.

अश्या वाढत्या कोरोना संकटात गर्दीतील लोकसंपर्क कमी व्हावा,व विनासुरक्षा (बिगर मास्क) वावरणाऱ्या नागरिकांमुळे (community ट्रान्समिसशन) कमी व्हावे एकंदरीत कोरोनाचा फैलाव रोखता यावा याकरीता राज्य सरकार बरोबरच जिल्हा प्रशासन आणि स्थानिक तालुका प्रशासन यांनी रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे मात्र माणगाव तालुक्यातील माणगाव शहर वगळता गोरेगाव लोणेरे या बाजारपेठा सताड उघड्या असलेल्या दिसून येत आहेत याबाबत आमच्या प्रतिनिधी जवळ स्थानिक नागरिकांनी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शासन नियम पाळणे गरजेचे आहे मात्र व्यापारी याबाबत उदासीन का? असा सवाल केला आहे? यावर आज १ एप्रिल पासून नक्की कारवाई करण्यात येईल असे पोलीस प्रशासनाने आमच्या प्रतिनिधिंशी बोलताना सांगितले आहे

कोरोना संदर्भात सर्व नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे,याकरिता शासन नियम पाळणे गरजेचे आहे.याकरीता पोलीस प्रशासनाकडून (announcement)करून देखील व्यावसायिक व नागरीक सहकार्याची भूमिका दाखवत नसतील तर आज १ एप्रिल पासून सर्व बाजारापेठांमधील गर्दी करणारे नागरीक व व्यावसायिक यांच्यावर शासनाच्या नियमाप्रमाणे दंडात्मक कारवाई केली जाणार.

प्रवीण पाटील

उपविभागीय पोलिस अधिकारी माणगाव

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.