सिटी बेल । पनवेल । संजय कदम ।
पोलीस असल्याची बतावणी करून दोन अनोळखी इसमांनी एका 66 वर्षीय वृद्ध इसमास लुटल्याची घटना कामोठे वसाहतीमध्ये घडली आहे.
तुकाराम जगताप (66 रा.सेक्टर 17, कामोठे) हे सेक्टर 36 येथून पायी जात असताना दोन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले व त्यांनी आपण पोलीस असल्याचे भासवून या रस्त्यावर खूप चोर्या होत आहेत असे त्यांना सांगून तुमच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून रुमालात बांधून ठेवा असे बोलण्यात गुंतवून त्यांच्या नकळत त्यांच्या अंगावर असलेले सोन्याचे ब्रेसलेट, सोन्याची अंगठ्या असा एकूण जवळपास 42 हजार रुपये किंमतीचा ऐवज काढून घेवून ते पसार झाले आहेत. याबाबतची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.








Be First to Comment