Press "Enter" to skip to content

विनामास्क फिरणा-यांना कर्जत नगरपरिषदेने केले मास्क चे वाटप

सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।

तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. आरोग्य विभाग आणि प्रशासनाकडून वारंवार नागरीकांना मास्कचा वापर करा. सॅनिटायझरचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन केले जात आहे तरी अजूनही काही नागरिक बाजारपेठेत विनामास्क फिरत आहेत त्यांना जागरूक करण्यासाठी कर्जत नगरपरिषदेने मास्क चे वाटप केले.

कोरोना महामारीचा प्रदर्भाव वाढत आहे शासन, स्थानिक प्रशासन वेळोवेळी खबरदारीचा सूचना देत आहेत, तरीही अजून काही नागरिक विनामास्क फिरत आहेत, तर बरेच दुकानदार विनामास्क व्यापार करत आहेत त्यांच्यात जागरूकता करण्यासाठी कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, बांधकाम सभापती स्वामिनी मांजरे, नगरसेवक बळवंत घुमरे, सोमनाथ ठोंबरे, माजी नगरसेविका बिनीता घुमरे नगरपरिषद कर्मचारी कल्याणी लोखंडे, ऋषीता शिंदे, सुदाम म्हसे, सुनिल लाड यांनी काल दि.30 मार्च रोजी सांयकाळी बाजारपेठ परिसरात मास्क न लावता जे नागरिक फिरत होते त्यांना मास्क देऊन कोरोना विषयी तसेच आपल्या कुटुंबाच्या काळजी पोटी तरी तुम्ही मास्क लावा आपले आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या असा संदेश दिला.

मास्क, सोशल डिस्टंसिंग, वारंवार हात धुणे हे कसे गरजेचे आहे ते पटवून दिले.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे, स्थानिक प्रशासन, नगरपरिषद विनामास्क फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करत आहे, नगरपरिषदेने एक वर्षाच्या कालावधीत सुमारे 280 जणांवर दंडात्मक कारवाई करून 1 लाख 40 हजार रुपये दंड वसूल केला आहे.शासन महामारीला रोखण्याचा प्रयत्न करत आहे पण नागरिकांनी शासनाच्या सुचनेचे पालन करणे गरजेचे आहे असे नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.