सद्दाम फरमान दफेदार यांनी केले स्वागत
सिटी बेल । नागोठणे । महेश पवार ।
महाराष्ट्र प्रदेशचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजितदादा तांबे यांनी कोकण दौऱ्यावर असताना वेळात वेळ काढून रायगड जिल्हा काँग्रेसचे तत्कालीन नेते पै. फरमानशेठ दफेदार यांच्या नागोठण्यातील निवासस्थानी शनिवारी सायंकाळी सदिच्छा भेट दिली. या भेटीमुळे नागोठणे मोहल्ल्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.
काँग्रेस नेते फरमानशेठ दफेदार यांच्या निधना नंतर जवजवळ एक वर्षानंतर आज काँग्रेस कार्यकर्ते पूर्वीप्रमाणे एकत्र आलेले दिसून आले. निमित्त होते सत्यजितदादा तांबे व काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांच्या सदिच्छा भेटीचे. यावेळी पै. फरमानशेठ दफेदार यांच्या आठवणींना जगताप यांनी उजाळा दिला.
यावेळी काँग्रेस युवा कार्यकर्ते सर्फराज हाफिज यांनी मीरा मोहद्दीन शहा बाबा दर्गा व नागोठणे ग्रामदैवत श्री जोगेश्वरी माता मंदिर सुशोभीकरणासाठी प्रत्येकी ५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सत्यजितदादा तांबे यांच्याकडे केली. दरम्यान सत्यजितदादा तांबे यांचे काँग्रेसचे युवा नेते सद्दाम दफेदार यांनी स्वागत केले.
यावेळी सत्यजितदादा तांबे व माणिकराव जगताप यांच्या समवेत युवक काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष प्रथमेश पाटील,हेमराज म्हात्रे , मजीदशेठ सय्यद , नागोठण्याचे माजी सरपंच लियाकतशेठ कडवेकर, शब्बीरशेठ पानसरे, काँग्रेसचे नागोठणे शहर अध्यक्ष अशपाक पानसरे, रोहा पं. स. सदस्य बिलाल, रियाझ दफेदार, सर्फराज हाफिज, सद्दाम दफेदार, रमीझ दफेदार, इक्बाल पानसरे, फझल दफेदार, सैफ दफेदार, ताबिश शेख, नियाज कुवारे, फैय्याज पानसरे, झुबेर पानसरे, फाहद गजगे, हनीफ पठाण, इर्शाद कुणके, सैफम पानसरे आदी उपस्थित होते.








Be First to Comment