अन्न प्रशासन आणी पोलिसांचा धाक ओसरला ?
सिटी बेल । पेण । राजेश कांबळे ।
विमल,पान मसाला सारख्या शरीराला घातक ठरणाऱ्या गोष्टींची विक्री करण्यास राज्य शासनाची बंदी घातली असल्याने मागील काही दिवसांपूर्वी पेण अन्न प्रशासन आमी पोलिस अधिकारी यांनी पेण शहरातील काही ठिकाणी धाड टाकून असे अवैध पदार्थ विकणाऱ्या व्यक्तींना गजाआड केले मात्र यामध्ये छोट्या व्यापा-यांपेक्षा मोठ्या गुटखा व्यापा-यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी नागरीक करीत आहेत.
त्यामुळे शहरातील अनेक पानपट्ट्यांवर आजही सर्रासपणे विमल गुटखा, पानमसाला सारखे पदार्थ विकले जात असल्याने यांच्यांवरचा धाक ओसरला की काय असे वाटू लागले आहे. मागच्या महिन्यात शहरातील गुटखा, गांजा यांसारख्या वस्तू विक्री करीत असणा-यांवर अन्य व पोलिस प्रशासनाने कारवाई केली, मात्र या कारवाई नंतर आता हे पेण शहर अशा प्रकारच्या अवैध वस्तूंपासून मुक्त होईल असे शहरातील सुज्ञ नागरिकांना वाटत होते. मात्र कारवाई नंतर काही दिवसातच याच वस्तू विकण्याचा प्रकार पुन्हा सूरु झाला आहे.
त्यामुळे याकडे अन्य व पोलिस प्रशासनाने लक्ष घालून अशा अवैध गुटखा विक्री करणा-यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.








Be First to Comment