Press "Enter" to skip to content

चिंचवली तर्फे दिवाळी भवानी देवीचा पालखी सोहळा उत्सहात संपन्न

सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।

रोहा तालुक्यातील चिंचवली तर्फे दिवाळी येथे होळीच्या उत्सवा निमित्ताने भवानी माता देवीचा पालखी सोहळा मोठया उत्सहात संपन्न झाला.

कोकणात होळी उत्सव मोठया उत्सही वातावरणात साजरा केला जातो.गेल्या वर्षी होळी उत्सव मोठया उत्सही वातावरणात साजरा झाल्या नंतर कोरोना विषाणूच्या महामारीला सुरुवात झाली.आणि सर्व सार्वजनिक, धार्मिक,आध्यत्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली.वर्षे उलटून गेले तरीही कोरोनाचा कहर सुरु असल्यामुळे सर्व कार्यक्रमासहित होळी उत्सवावर निर्भध घालण्यात आले.

परंतु शासनाने दिलेल्या सुचनेचे व सोशल डिस्टन्स पालन करीत चिंचवली तर्फे दिवाळीचे अध्यक्ष श्री.मारुती रामा मालुसरे,पोलीस पाटील रविंद्र येरुणकर यांच्या मार्गदर्शना खाली भवानी मातेचा पालखी सोहळा मोठया उत्सहात साजरा करण्यात आला.

यावेळी अनिषा मालूसरे,स्मिता मालूसरे,उषा मालूसरे,सायली सावळे,वैशाली भिल्लारे,मिनल मांडवकर,सपना मालूसरे,शुभांगी भोसले,शोभा भिल्लारे या महिला वर्ग व ग्रामस्थांचा सहभाग योग्य अंतर ठेवून व सोशल डिस्टनचा पालन करीत भवानी माता देवीचा पालखी सोहळा मोठया उत्सहात संपन्न झाला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.