Press "Enter" to skip to content

आ.अनिकेत तटकरे यांच्याकडून खरबाचीवाडी अंतर्गत रस्त्यासाठी निधी  मंजूरीचे पत्र

सिटी बेल । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।

रोहे तालुक्यातील चिंचवली तर्फे अतोणे ग्रा.पं.हद्दीतील खरबाचीवाडी येथील अंतर्गत रस्त्याचे विकासकामासाठी
महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे आ.अनिकेत तटकरे यांच्याकडून रू.850000/-एवढ्या विकासकामाचे निधीचे पत्र मंजूर झाले आहे.
   

रायगडचे खा.सुनील तटकरे,पालकमंत्री आदिती तटकरे व आ.अनिकेत तटकरे यांनी शासनाकडून वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिल्याने चिंचवली तर्फे अतोणे ग्रा.पं.हद्दीत मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली आहेत.तर आगामी काळात देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्याच माध्यमातून खुप मोठ्या प्रमाणावर विकासकामे होणार असल्याचे उपसरपंच संजय मोते यांनी माहिती देताना  सांगितले. तर आ.अनिकेत तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी संपन्न झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात सदरचे विकासकामाचे निधी मंजूरीचे पत्र देण्यात आले.

यावेळी ग्रामस्थ मधू कदम , गंगाराम काटकर , शंकर गोळे ,किसन घोलप ,मारुती मांडवकर , सादूराम पवार ,ग्राम पंचायत चींचवली तर्फे अतोणेचे उपसरपंच संजय मोते यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.