Press "Enter" to skip to content

खांब-कोलाड मध्ये कोरोना पार्श्वभूमीवर होळीसह धुळवड साध्या पद्धतीने साजरी

सिटी बेल । खांब – रोहे । नंदकुमार मरवडे ।

कोरोना महामारीचा वाढत चाललेला प्रादुर्भाव पाहता शासनाकडूनही सण-समारंभ तसेच अन्य सार्वजनिक कार्यक्रम साजरे करण्यावर कडक निर्बंध लादले असल्याने साजरा करण्यात आलेला होळी सण व धुळवड अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.

खांब-कोलाड विभागात होळी सण व धुळवड हे पारंपारिकरित्या साजरे करताना शासकीय नियमानुसार साजरे करण्यात आले.दरवर्षी होळी सणामध्ये व धुळवड साजरी करताना दिसून येणारा उत्साह कोरोनामुळे कुठे जाणवलाच नाही. तर बच्चे कंपनीने मात्र धुळवडीमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन धुळवडाचा आपला उत्साह कमी पडू दिला नाही. धुळवडीमध्ये विविध रंगांनी न्हाऊन निघालेली बच्चे कंपनी मात्र ठिकठिकाणी दिसून येत होती.एरव्ही मोठी मंडळीही धुळवडीमध्ये सहभागी होऊन धुळवड साजरी करून आपला आनंद लुटत असत.परंतू यावर्षी मात्र तशाप्रकारचे द्रुश्य पाहण्यास आले नाही.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.