Press "Enter" to skip to content

रोहा नगर परिषदे लगतच्या तलावात ४१ वर्षीय इसमाचा बुडून मृत्यू

सिटी बेल । धाटाव । शशिकांत मोरे ।

रोहा नगरपालिकेच्या नजिकच्या तलावात एका ४१ वर्षीय इसमाचा मृतदेह सापडल्याने रोह्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे. सदर व्यक्ती ही धनगर आळीतील असल्याची खबर रोहा पोलीस ठाण्यात देण्यात आली.

काल धुलीवंदनाच्या सणाच्या दिवशी सायंकाळी सहा वाजता धुळवड उत्सव साजरा झाल्यानंतर महेंद्र यशवंत सोनवटकर(४१), रा.रोहा ही व्यक्ती सायंकाळी सहा वाजल्यापासून घरात नसल्याची खबर रोहा पोलीस ठाण्यात देण्यात आली होती.त्याचा शोध घेत असताना आज सकाळी ३०मार्च रोजी रोहा नगर परिषद लगत असलेल्या तलावामध्ये त्याचा मृतदेह सापडला.

यावेळी तेथे असलेली काही मुले व कामगार यांनी त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढून रोहा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला.

दरम्यान उपजिल्हा रुग्णालय मध्ये डॉक्टर उपलब्ध नसल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.मात्र प्रकरण हाताबाहेर जाणार नाही याची काही नागरिकांनी काळजी घेत घेतली.यावेळी माजी उपनगराध्यक्ष मयुर दिवेकर,रवींद्र चाळके,राजेश काफरे व नातेवाईक, ग्रामस्थ उपस्थित होते.

या घटनेचा पुढील तपास रोहा पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, ए.पि.आय शेगडे,कल्पेश काबळे, कुथे प्रनीत पाटील,सुनिल पाटील सह सहकारी करत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.